Wednesday, August 19, 2026
Homeभंडारावाघिणीने तीन बछड्यांसह मिळून केली रानगव्याची शिकार...

वाघिणीने तीन बछड्यांसह मिळून केली रानगव्याची शिकार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या तीन वाघिणींपैकी एनटी-२ या वाघिणीने नुकताच तीन छाव्यांना जन्म दिला.हे छावे आपल्या आईसोबत जंगलात फिरताना दिसून येत आहेत. तसेच एक शिकारदेखील केली आहे.छाव्यांच्या जन्मामुळे प्राणीमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभागाने राबविलेल्या वाघाचे संवर्धन, स्थानांतरण या उपक्रमात आतापर्यंत एकूण तीन वाघिणींचे स्थांनतर करण्यात आले आहे.त्यात पहिल्या टप्प्यात २० मे २०२३ रोजी एनटी-१ आणि एनटी-२ या वाघिणी,तर दुसऱ्या टप्प्यात एनटी-३ वाघिणीला ११ एप्रिल २०२४ रोजी नागझिरा वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात आले होते.एनटी-२ या वाघिणीने राखीव क्षेत्रात आपली जागा निर्माण केली. तिच्या हालचालींवर ट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने संनियंत्रण करण्यात येत आहे.कॅमेऱ्यात एनटी-२ वाघीण आपल्या तीन छाव्यांसोबत रानगव्याची शिकार करताना कैद झाली आहे.इतर दोन वाघिणींनी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात आपला अधिवास निर्माण केला आहे.वाघिणीने दिलेल्या छाव्यांचा व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून वन्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! आश्रमशाळेच्या शिपायाकडून दोन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील एका निवासी आश्रमशाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे.चक्क शिपायाकडून(नाइट वॉचमन)दोन विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाची...

देसाईगंज एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना विविध संस्था भेटीतून सामाजिक कार्याचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच एम.एस.डब्ल्यू.(समाजकार्य पदव्युत्तर पदवी) अभ्यासक्रमाच्या १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक संस्थांना संस्था भेटीचे आयोजन करण्यात आले.या भेटीदरम्यान...

विजेचा जोरदार शॉक; दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त पुणे :-घराजवळ असणाऱ्या जनावरांच्या गोठ्याजवळ विजेचा जोरदार शॉक लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी...

खुद्द पत्नीनेच प्रियकर दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा.. -अनैतिक संबंधाचा बिन भाड्याच्या खोलीत ‘दी एंड’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-अनैतिक संबंधात आडकाठी येणाऱ्या पतीचा खुद्द पत्नीनेच प्रियकर चुलत दिराच्या मदतीने काटा काढल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!