Saturday, October 10, 2026
Homeचंद्रपूरबडतर्फ पोलीस विवाहितेच्या प्रेमात पडला अन् अनर्थ घडला.. - संशयाची सुई बळावली...

बडतर्फ पोलीस विवाहितेच्या प्रेमात पडला अन् अनर्थ घडला.. – संशयाची सुई बळावली अन् बिंग फुटले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका चोरीच्या गुन्ह्यात अडकलेला बडतर्फ पोलीस विवाहितेच्या प्रेमात पडला,लग्न करू आणि पळून जाऊ,असे म्हणताच विवाहितेने नकार दिला.नकार देताच ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची बाब समोर आली आहे.एका बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याने अनैतिक संबंधातील वादातून तिची ओढणीने गळा आवळून हत्या केली आहे.त्यानंतर त्याने नागपूरच्या बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेळाहरी येथील शौचालयाच्या टँकमध्ये तिचा मृतदेह पुरला.चंद्रपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने त्याला दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला.
नरेश ऊर्फ नरेंद्र डाहुळे वय ४० वर्षे असे आरोपीचे नाव आहे; तर अरुणा अभय काकडे वय ३७ वर्षे, नूतन आदर्शन कॉलनी,चिमूर ही मृत महिला आहे. अरुणा यांचे चिमूरमध्ये दुकान होते.त्या नियमितपणे नागपुरात खरेदीसाठी जात होत्या.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी त्या दुकानासाठी कॉस्मेटिक सामानाच्या खरेदीसाठी नागपुरात गेल्या होत्या.तेथून त्या इतवारीत गेल्या होत्या मात्र,त्या दिवशी त्या परतल्याच नाही.त्यांचा फोनदेखील बंद होता.त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला.अखेर त्यांचे पती अभय यांनी चिमूरमध्ये तक्रार केली.त्यानंतर नागपुरातील तहसील पोलिस ठाण्यातदेखील तक्रार केली.पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.मोबाइलचे अखेरचे लोकेशन गांधीबाग परिसरात दाखविले होते. त्यांनी त्या दिवशी तेथूनच पतीशी संपर्कदेखील साधला होता.त्यानंतरपासून फोन बंद होता. चंद्रपुरातील सायबर सेलचे पथक व तहसील पोलिस ठाण्याच्या पथकाकडून समांतर तपास सुरू होता. पोलिसांनी तिच्या मोबाइलचा ‘सीडीआर’ काढला.
पोलिसांना नरेशवर त्यातूनच संशय आला.त्याला चंद्रपूर पोलिसांनी दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती.अरुणा काकडे हिच्या बेपत्ता होण्यामागे त्याची भूमिका संशयास्पद वाटली.त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने हत्येची कबुली दिली. त्याने अरुणाचा मृतदेह पुरल्याची जागा दाखवली. चंद्रपूर पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला.सन २०२३ मध्ये नरेश हा स्थानिक अपराध शाखेत कार्यरत होता.त्या कालावधीत चंद्रपूरमध्ये अनेक चोऱ्या झाल्या होत्या. त्यांतील एका प्रकरणात नरेशला अटक करण्यात आली होती.त्यानंतर पोलिस दलातून त्याला बडतर्फ करण्यात आले होते.
आरोपी नरेशने याने आपण पळून जाऊ अन् लग्न करू.वर्गमैत्रीण अरुणाने पळण्यासाठी नकार दिला अन् नरेशचा राग मस्तकी गेला.मात्र,दोघात झालेल्या वादात प्रियकराने रागात गळा आवळून तिचा खून केला.हा फिल्मी स्टाईल थरार आरोपी नरेशने सांगीतला.नागपुरात खरेदीसाठी गेलेल्या चिमूर येथील व्यापारी महिलेचा खून करण्यात आला.या महिलेचा मृतदेह नागपुरातील बेलतरोडी मार्गावरील जंगलात आढळून आला.याप्रकरणी बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली.तपासात तो तिचा वर्गमित्र असल्याचे समोर आले.हे दोघे मागील काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते.पळून जाण्याचा बेतही आखला.मात्र ही योजना फसली आणि रागातून गळा आवळून खून केल्याचे आरोपी नरेशचे म्हणणे आहे.
नरेश व अनुराधा वर्गमित्र होते.दहावीनंतर दोघांचाही संपर्क तुटला होता.ऑगस्ट महिन्यात फेसबुकच्या माध्यमातून दोघे पुन्हा संपर्कात आले.२६ नोव्हेंबरला नागपुरात अरुणा गांधीबाग परिसरात पोहोचताच नरेशने आपल्या कारमध्ये बसवून रेशीमबाग परिसरात घेऊन गेला.तेथेच कडाक्याचे भांडण होताच रागाच्या भरात गळा आवळल्याची कबुली दिली.चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन व चिमूर पोलिस स्टेशनतर्फे संयुक्त तपास मोहीम राबविण्यात आली.यात अनुराधाचा वर्गमित्र सतत संपर्कात असणारा नरेश डाहुळे पर्यंत तपास पोहचला.चोरीचे सिम कार्ड वापरून तसेच वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून पोलिसांना हुलकावणी देत होता.अखेर मोबाईल सीम रिचार्ज केल्याने त्यांच्यापर्यंत पोहचण्यात यश मिळाले.
नागपुरातन नरेशला अटक करण्यात आली. त्याच्याजवळील दुचाकीसुद्धा चंद्रपुरातून चोरी केल्याचे समोर आले.चौकशीत त्याने रागाच्या भरात हत्या करून मृतदेह जंगलात पुरल्याची कबुली दिली. मृतक महिला आणि मी एकमेकाच्या अनेक दिवसांपासून संपर्कात होतो.पळून जाण्याचा निर्णय घेतला.परंतु तिने नकार दिला.यामुळे रागाच्या भरात तिची हत्या केल्याचे त्याने सांगितले.चिमुरात सहाय्यक पोलिस अधिक्षक नयोमी साटम व सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी नरेशकडून माहिती घेतली,त्याला १४ तारखेपर्यंत ३ दिवसांचा पीसीआर मिळाला आहे.भांडणादरम्यान रागात नरेशने अनुराधाच्या ओढणीनेच तिचा गळा आवळला.पळून यायला नकार देईल म्हणून तीला खुश ठेवण्यासाठी त्याने नागपुरातून कार किरायाने घेतली.कारमध्येच अनुराधाचा मृतदेह घेऊन शहरभर फिरला.अखेर त्याने अनुराधाचा मृतदेह वेळाहरी गावातील एका निर्माणाधीन इमारतीच्या सेप्टिक टँकमध्ये फेकला. मृतदेह कुजल्यानंतर सर्वांना घटनेची माहिती होईल, या भीतीने त्याने कुत्र्याचीही हत्या करून तो मृतदेह सेप्टिक टैंकजवळ फेकला.स्वतःचा आणि अनुराधाचा मोबाईल बंद करून गांधीबाग परिसरात पोहोचला.तेथे पुन्हा मोबाईल सुरू केले आणि दोन्ही फोन रस्त्यावर फेकले असे त्याने सांगितले.
मृत अरुणा काकडे यांच्या वडिलांचे गाव हे चिमूर तालुक्यातील सिरसपूर असून त्यांचे पुढील शिक्षण शंकरपूर येथे झाले होते, तर आरोपी नरेंद्र डाहुले यांचे वडील शंकरपूर येथे विद्युत महामंडळात नोकरीला होते. त्यामुळे दोघेही शंकरपूर येथे दहावी- बारावीपर्यंत शिकत असतानाची जुनी ओळखी होती व दोघेही दूरचे नातेवाईक असल्याची माहिती आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!