Thursday, September 3, 2026
Homeभंडारावाघ धावला तो डोक्यावर,खांद्यावर व पायांवर गंभीर जखमा करूनच पळाला..!

वाघ धावला तो डोक्यावर,खांद्यावर व पायांवर गंभीर जखमा करूनच पळाला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एखाद्या निर्जनस्थळी असतांना वाघाचे दर्शन तर सोडाच,नुसते नाव ऐकले तरीही अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.त्यातच एखादा वाघ अंगावर धावून आला तर अश्याची अवस्था काय होणार?अश्याच प्रकारे शनिवारी दुपारच्या सुमारास शेतावर गेलेल्या शेतकऱ्यास वाघाचे दर्शन तर झालेच,पण अचानकपणे वाघाने झडप घालून शेतकऱ्याच्या डोक्यावर,खांद्यावर व पायांवर गंभीर जखमा केल्याची घटना साकोली तालुक्यातील किन्ही(एकोडी) गावाजवळील शेतीशिवारात घडली.विशेष म्हणजे,परिसरातील शेतकऱ्यांनी आरडाओरड करून घटनास्थळी धाव घेतल्याने वाघाने जंगलात धूम ठोकली.अन्यथा ऐन सणासुदीच्या काळात मोठी दुर्घटना घडली असती.घटनेत किन्ही(एकोडी) गावातील ४५ वर्षीय ब्रिजलाल हरिनखेडे गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर सध्या साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.काल शनिवारी ब्रिजलाल हे आपल्या शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते.पीक पाहणी करून परत जात असतांना सोमाजी बघेले यांच्या शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला.अचानक झालेल्या हल्ल्याने ब्रिजलाल वाघाशी झटापट केली.मात्र,यात ब्रिजलाल यांच्या डोक्यावर,खांद्यावर व पायांवर गंभीर जखमा झाल्या. घटनेच्या ठिकाणी उपस्थित शेतकरी व मजुरांनी आरडाओरड करून धावपळ केली.ज्यामुळे वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला.लागलीच नागरिकांनी घटनेची माहिती वन विभागास देत ब्रिजलाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेने परिसरातील शेतकरी धास्तावले असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी गावकरी तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!