Sunday, June 21, 2026
Homeचंद्रपूरवन क्षेत्रातून रेतीची चोरी; ४ ट्रॅक्टर जप्त... - ११ जणांवर वनगुन्हा दाखल...

वन क्षेत्रातून रेतीची चोरी; ४ ट्रॅक्टर जप्त… – ११ जणांवर वनगुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-अनेक ठिकाणी रेतीघाट लिलाव झाले नसल्याने सर्वत्र रेतीचा तुटवडा जाणवत आहे. पावसाळ्यात रेतीला सोन्याचा भाव मिळत असतो. अशातच चोरीची रेती वापरल्याशिवाय अनेकांना पर्याय नाही.त्यामुळे रेती चोरांशी हातमिळवणी करून कमी-जास्त दरात रेती खरेदी केली जाते.त्यातच रेती नदीतील असो वा वनविभाग हद्दीतील असो; याचे कुणालाही देणे-घेणे नसते.असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा वनक्षेत्रात उघडकीस आला आहे.
रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करत असताना वनविभागाने शनिवारी राजुरा वनक्षेत्रातील नाल्यावर धाड टाकून चार ट्रॅक्टर जप्त केले.याप्रकरणी ११ आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या रेतीला मोठी मागणी असल्याने काही ट्रॅक्टरचालक विना परवानगी रात्रीच्या दरम्यान वनक्षेत्रातील नाल्यातून रेती तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली.या माहितीच्या आधारावर उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू,उपविभागीय वनाधिकारी पवनकुमार जोंग यांनी विशेष मोहीम राबवून राजुरा, रामपूर,सुमठाणा या नियतक्षेत्रातून अवैधरित्या रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त केले. याप्रकरणी ट्रॅक्टर मालकांसह एकूण ११ आरोपींवर वनगुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते, वनरक्षक संदीप तोडासे,पवन मदुलवार,सुनील गजलवार,पवन देशमुख,मारोती चापले,वनमजुर गंगाधर भेडारे मयूर आत्राम,निखिल खोब्रागडे,नरेश निखाडे,चालक मंगल पंचभाई,जीवन कावडे यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!