Thursday, September 24, 2026
Homeमुंबईलोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील मतदान उद्याला...

लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील मतदान उद्याला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचाराला काल, शनिवारी पूर्णविराम मिळाला.मुंबईतील सहा जागांसह ठाणे,कल्याण,भिवंडी,पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या १३ लोकसभा मतदारसंघांत उद्या सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे.पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशीसुद्धा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडल्याने राजकीय तापमानसुद्धा वाढल्याचे चित्र आहे.प्रत्यक्ष प्रचाराचा कालावधी संपला असला,तरी आता पुढील दोन दिवस छुप्या प्रचाराला गती येणार आहे.त्यामुळे निवडणूक आयोगासह संपूर्ण निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे.शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीवर विशेषतः भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी पवार गटाच्या शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा समाचार घेतला.त्यानंतर,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम ९ मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या मतदारसंघात रोड शो केला.मुंबईत रोड शो तसेच ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी दक्षिण मध्य आणि दक्षिण नवी मुंबईत सभा घेतल्या.या सभांच्या माध्यमातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली.या प्रचाराची सांगता उद्धव ठाकरे यांनी मुंबादेवी मंदिरात दर्शनाने केली. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे,आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!