Thursday, September 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा…

गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- जून महिना संपायला अवघे दहा दिवस बाकी असतानाही अवकाळी पाऊस विदर्भातून जायला तयार नाही.दर दिवशीच हवामान खाते येलो ऑरेंज अलर्ट घोषित करून नागरिकांना अलर्ट करीत आहे.हवामान खात्याने आज रविवारी (दिनांक -१९) पुन्हा पाच दिवसाचा दिनांक- १९ मे ते २३ मे पर्यंत यलो अलर्ट घोषित केला आहे.यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे.

विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात नागपूर,वर्धा भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी तीन दिवसाचा यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.यंदाचा संपूर्ण उन्हाळा अवकाळी पावसात जात आहे.वादळी वारा गारपीटीसह अवकाळीचे आगमन होऊन शेतकरी त्रस्त झाला आहे.दर दिवशी हवामान खात्याचा इशारा येत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.यावर्षीचा संपूर्ण उन्हाळाच अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला आहे.त्यामुळे कधी पावसाळा तर कधी उन्हाळ्याचा अनुभव नागरिकांना घेत आहे.परंतु अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या विदर्भातील चंद्रपूर भंडारा वर्धा गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी उन्हाळी धान पिकांची लागवड करण्यात आली आहे.काही ठिकाणी फळबागा,भाजीपालाचे उत्पन्न घेतली जात आहे; परंतु अवकाळी पावसात वादळीवाऱ्यासह पाऊस येत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.दिवसागणिक हवामान खात्याचा अंदाज बदलत आहे.आज १९ मे ला हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज रविवारपासून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात २३ मे पर्यंत पाच दिवसाचा तर नागपूर, वर्धा,भंडारा गोंदिया येथे पुढचे दोन दिवस आज आणि उद्या वगळता २३ मे पर्यंत तीन दिवसाचा यलो अलर्ट चा इशारा दिला आहे.

आठदिवसांवर येवून ठेपलेल्या जून महिन्यामध्ये हवामान खात्याने दिलेल्या इशारा नुसार पावसाला पडायला सुरूवात होईल.यावर्षीचा पावसाळा गेल्यापासून मार्च,एप्रिल,मे तिन्ही महिन्यात अवकाळी पडत आहे.दिवसाआड अवकाळी पाऊस कुठे ना कुठे कोसळत असल्यामुळे त्याचा परिणाम शेतपिकावर झाला आहे.सध्या पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात उन्हाळी धनाची लागवड करण्यात आलेली आहे.

काही ठिकाणी हार्वेस्टर व्दारे धानाची मळणी झालेली आहे.परंतु काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे धान कापणी मध्ये अडचण अडथळे येत आहे.अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह येत असल्यामुळे धान पडलेले आहेत.त्यामुळे धानाचे प्रचंड नुकसान होत आहे.दरदिवशी हवामान खाते अवकाळीचा इशारा देत आहे.त्यामुळे अवकाळी पाऊस पडला तर शेतकऱ्यांना धान कापणी करताना मोठी नुकसान सहन करावी लागू शकते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!