Saturday, April 18, 2026
Homeनवी दिल्लीलैंगिक अत्याचाराचा कठोर कायद्या झाला; पण काही लोक इतरांना त्रास देण्यासाठी शस्त्र...

लैंगिक अत्याचाराचा कठोर कायद्या झाला; पण काही लोक इतरांना त्रास देण्यासाठी शस्त्र म्हणून वापर करू लागले- उच्च न्यायालयाय – पुरुषाविरुद्धचा बलात्काराचा गुन्हा रद्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-लैंगिक अत्याचाराचा कठोर कायद्या झाला; पण काही लोक याचा इतरांना विनाकारण त्रास देण्यासाठी शस्त्र म्हणून वापर करू लागले असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवित एका पुरुषाविरुद्धचा बलात्काराचा गुन्हा रद्द केला.
एका प्रकरणात पुरुषाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार पुरुषाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा म्हणून पुरुषाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.ज्या महिलेने हा गुन्हा दाखल केला होता,ती महिला आणि सदर पुरुषाचा पूर्वीपासून संबंध होता.दोघांमधील संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दाखला देत न्यायालयाने या प्रकरणात बलात्काराचा पुरावा नसल्याचा निर्णय घेतला. न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह म्हणाले की,ज्या तरतुदीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.तो महिलांवरील सर्वात गंभीर अत्याचाराचा गुन्हा आहे.
तथापि,हे देखील एक प्रस्थापित सत्य आहे की,काही लोक याचा विनाकारण छळ करण्यासाठी शस्त्र म्हणून वापर करतात.दरम्यान,सदर प्रकरणात रेकॉर्डिंग, व्हॉट्सॲप चॅट्स आणि इतर गोष्टींमुळे पुरुष आणि स्त्रीने संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यास सहमती दर्शविल्याचे स्पष्ट झाले आहे.न्यायालयाने सांगितले की,या प्रकरणाने निष्पाप व्यक्तींना कायदा कसा अवाजवी त्रास देऊ शकतो याचे उदाहरण दिले आहे. संबंध संपल्यानंतरही ही महिला त्या पुरुषाच्या संपर्कात होती,वैयक्तिक तपशील सदर पुरुषाला सांगत होती.त्यामुळे न्यायलयाने संपूर्ण प्रकरणाची पडताळणी करून पुरुषाविरुद्धचा बलात्काराचा गुन्हा रद्द केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!