Monday, September 21, 2026
Homeनागपूरअखेर नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपन्न... - १७ विधेयक मंजूर तर २ विधेयक...

अखेर नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपन्न… – १७ विधेयक मंजूर तर २ विधेयक प्रलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-यंदाचे हिवाळी अधिवेशन काही मुद्यांना अनुसरून गाजले तर शेतकरी,लाडकी बहिण योजना व इतर विषयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
नागपुरात तब्बल ६ दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाची आज,शनिवार २१ डिसेंबरला सांगता झाली असून सदर अधिवेशनात १७ विधेयक मंजूर तर २ विधेयक प्रलंबित आहेत.दरम्यान,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन हे येत्या नवीन वर्षातील ३ मार्च रोजी मुंबईत होणार असल्याचे स्पष्ट केले.अधिवेशनात दोन्ही सभागृहात एकूण संयुक्त समितीकडे एक आणि विधान सभेत एक विधेयक प्रलंबित आहे.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७८ सदस्य नवीन निवडून आले आहेत,तर ५ जण विधानपरिषदेवरून विधानसभेत आले आहेत.नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एकूण ६ बैठका झाल्या असून ४६ तास २६ मिनिटे कामकाज झाले आहे.
विधानसभेत प्रलंबित विधेयक👇
 
महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन)(सुधारणा) विधेयक,२०२४ (महसूल व वन विभाग)(दंडाच्या कमाल मर्यादेत वाढ)
संयुक्त समितीकडे प्रलंबित विधेयक👇
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक,२०२४ (गृह विभाग)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!