- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील एका नक्षलीने तर छत्तीसगढ राज्याच्या नारायणपूर जिल्ह्यातील एका नक्षलीने असे दोन जहाल नक्षल्यांनी गडचिरोली पोलिस व सीआरपीएफ दलासमोर काल,शुक्रवारी २० डिसेंबरला आत्मसर्मपण केले आहे.रामसू दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग वय ५५ वर्षे रा.गट्टानेली,ता.धानोरा, जि. गडचिरोली व रमेश शामु कुंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित वय २५ वर्षे रा.वेडमेट्टा,जि.नारायणपूर, छत्तीसगढ अशी आत्मसमर्पित नक्षल्यांची नावे आहेत.दोन्ही नक्षली मागील ३० वर्षांपासून नक्षली चळवळीत कार्यरत होते.चकमक,हिंसाचार,हत्या,जाळपोळ व दरोड्यात दोघांचाही सक्रिय सहभाग होता.शासनाने दोघांवरही ८ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
- Advertisement -

