Monday, September 21, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा पीएम श्री जिल्हा परिषद‌ उच्च प्राथमिक शाळेत 'खरी कमाई-बाल आनंद मेळावा'...

कोंढाळा पीएम श्री जिल्हा परिषद‌ उच्च प्राथमिक शाळेत ‘खरी कमाई-बाल आनंद मेळावा’ संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-शालेय विद्यार्थ्यांना
व्यवसायाबद्दल माहिती व्हावी व व्यवसायातून गोळा केलेल्या पैश्याचे नियोजन करून श्रमाचे महत्व कळावे,या उदात्त हेतूने देसाईगंज तालुक्याच्या
कोंढाळा पीएम श्री जिल्हा परिषद‌ उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने ‘खरी कमाई-बाल आनंद मेळावा’ आज,शनिवार २१ डिसेंबरला सकाळच्या सुमारास शालेय विद्यार्थी,ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पारधी,उपाध्यक्ष पवन खोब्रागडे,माजी सैनिक तथा पोलीस कर्मचारी देविदास नागोसे,पालक देवराव बुराडे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक,शाळेतील संपूर्ण शिक्षकवृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
आज शनिवारी राबविण्यात आलेल्या ‘खरी कमाई-बाल आनंद मेळावा’ उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी सकाळच्या सुमारास घरून बनवून आणलेल्या विविध खाद्यपदार्थांचे शाळेच्या आवारात स्टॉल लावण्यात आले होते.लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये खमण ढोकळा,पुरी भाजी,चिवडा, चना उसळ,गोड मिठाई व इतर अश्या एकूण २७ विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश होता.५ रुपयांपासून ते आस्वाद घेण्यापर्यंत खाद्यपदार्थांची खरी कमाई ठरविण्यात आली होती.सर्वप्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पारधी यांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांशी हितगुज साधून खाद्यपदार्थांविषयी माहिती जाणून घेतली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.सदर उपक्रमाच्या यशस्वीेतेकरिता शाळेतील संपूर्ण शिक्षकवृंदांनी सहकार्य करून ‘खरी कमाई-बाल आनंद मेळावा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!