Monday, September 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर शपथविधीच्या आठ दिवसानंतर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर... - गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीसांकडेच;...

अखेर शपथविधीच्या आठ दिवसानंतर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर… – गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीसांकडेच; पहा संपूर्ण यादी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- तब्बल आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज,शनिवार २१ डिसेंबरला महायुती सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहे.३३ कॅबिनेट मंत्री तर ६ राज्यमंत्र्यांचे  खातेवाटप जाहीर झाले असून गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहे.तर गृह,ऊर्जा, न्याय व विधी,सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेली सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत.नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.तर ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण,सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदेंना मिळाली आहेत.अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच आहेत.
कॅबिनेट मंत्री👇
१.अदिती तटकरे – महिला व बालविकास
२. शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
३. माणिकराव कोकाटे – कृषी
४. जयकुमार गोरे – ग्रामविकास,पंचायत राज
५. नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
६. संजय सावकारे – कापड
७. संजय शिरसाट – सामाजिक न्याय
८. प्रताप सरनाईक – वाहतूक
९. भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
१०. मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
११. नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
१२. आकाश फुंडकर – कामगार
१३. बाबासाहेब पाटील – सहकार
१४. प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
१५. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
१६. राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
१७. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
१८. चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण,संसदीय कामकाजमंत्री
१९. गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ,तापी, कोकण विकास),आपत्ती व्यवस्थापन
२०. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
२१. गणेश नाईक – वन
२२. दादाजी भुसे – शालेय शिक्षण
२३. संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
२४. धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
२५. मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
२६. उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
२७. जयकुमार रावल – विपणन,प्रोटोकॉल
२८. पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
२९. अतुल सावे – ओबीसी विकास,दुग्धविकास मंत्रालय,ऊर्जा नुतनीकर
३०. अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
३१. शंभूराज देसाई – पर्यटन,खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
३२. आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
३३. दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
राज्यमंत्री👇
३४. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य,कुटुंब कल्याण,पाणी पुरवठा
३५. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन
३६. योगेश कदम – गृहराज्य शहर
३७. पंकज भोयर – गृहनिर्माण
३८. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय,अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय,वैद्यकीय शिक्षण
३९. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन,विधी व न्याय
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!