Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीदेसाईगंज-गडचिरोली रेल्वे प्रकल्प तात्काळ पूर्ण करा.. - खासदार डॉ.नामदेव किरसान..

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे प्रकल्प तात्काळ पूर्ण करा.. – खासदार डॉ.नामदेव किरसान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे प्रकल्प लवकरात-लवकर पूर्ण करून रेल्वेविषयक समस्या व रेल्वेगाड्यांचा थांबा मिळण्यासंदर्भात गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत पत्रक सादर केले आहे.त्याचप्रमाणे छत्तीसगड ते गडचिरोली रेल्वे लाइन भविष्यात करण्याच्या अनुषंगाने नकाशा घेऊन चर्चा केली.यावेळी मतदारसंघातील देसाईगंज रेल्वेस्टेशनवर गाडी क्र.२२१७३ व २२१७४ जबलपूर ते चांदा फोर्ट व चांदा फोर्ट ते जबलपूर गाडी क्र.०७०५१ व ०७०५२ हैदराबाद ते रकसौल व रकसौल ते हैदराबाद या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली.मतदारसंघातीलच आमगाव रेल्वेस्थानक येथे गाडी क्र.१२०६९ व १२०७० रायगड ते गोंदिया व गोंदिया ते रायगड जनशताब्दी एक्स्प्रेसचा थांबा देण्यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.मागील कालावधीत अश्याच प्रकारे प्रवासी रेल्वे गाड्या संदर्भात किरसान यांनी संसदेत मुद्दा उचलून धरल्याने प्रशासन खळबळून जागे होऊन प्रवासी रेल्वे गाड्या देसाईगंज-चांदाफोर्ट-गोंदिया सुरू करण्यात आल्याने रेल्वे प्रवाश्यांनी खासदार डॉ.नामदेव किरसान यांचे आभार मानले होते,हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!