Sunday, April 19, 2026
Homeचंद्रपूरबहीण शेतात कापूस वेचण्यासाठी गेली अन् घटनेचा उलगडा झाला... दोन दिवस मृतदेह...

बहीण शेतात कापूस वेचण्यासाठी गेली अन् घटनेचा उलगडा झाला… दोन दिवस मृतदेह शेतातच होता पडून.. – शेतकऱ्याची विचारपूस करणारा वालीच नसल्याने दोन दिवसांनी घटना उघडकीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच तालुक्यांमध्ये काही महिन्यांपासून हिंस्त्र प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे.शेतावर जाणाऱ्या नागरिकांसह मार्गावरून आवागमन करणाऱ्या नागरिकांनाही हिंस्त्र प्राण्यांनी भक्ष्यस्थानी प्राधान्यक्रम दिल्याचे हल्ली सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांनी शेती करणे सोडावे काय? असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला आहे.अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तेलंगणा-महाराष्ट्र राज्य सीमेवर असलेल्या आदिवासी अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुरा तालुक्यातील बगूलवाई येथे एक हृदयाला हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.कापूस वेचण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढवून ठार तर केले; मात्र,शेतकऱ्याची विचारपूस करणारा कुणीही वालीच नसल्याने सदरची घटना दोन दिवसांनी उघडकीस आली आहे.
घटनेची महिती अशी की,राजुरा तालुक्यातील शेतकरी जंगू मारू आत्राम वय ५३ वर्षे हे बुधवार १८ डिसेंबरला कापूस वेचण्यासाठी सकाळी सातच्या सुमारास आपल्या शेतात गेले.शेतात कापूस वेचत असतांना अचानक तिथेच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला.यात जंगू आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला.जंगू आत्राम यांची पत्नी ही मागील दीड वर्षापूर्वी आजाराने मरण पावली.त्यामुळे एकुलता एक मुलगा होता. परंतु,तोसुद्धा दिव्यांग आहे.त्यामुळे त्याला कुणाचा आधार मिळाला नाही.ही घटना उघडकीसदेखील आली नाही.मृताची बहीण काल,शुक्रवारी २१ डिसेंबरला शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेली असता,तिला जंगू आत्राम यांचा मृतदेह दिसला.त्या ठिकाणी रक्त सांडलेले दिसले.वाघाचे केस व पगमार्कही आढळून आले. त्यामुळे घटनेची माहिती परिविक्षाधीन उपविभागीय वनअधिकारी पी.एन.अवधूतवार यांना देण्यात आल्याने ते वन कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला.सदर घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!