Thursday, August 27, 2026
Homeनागपूरखाते वाटप मंत्रीमंडळात भाजपचाच पलडा भारी..!

खाते वाटप मंत्रीमंडळात भाजपचाच पलडा भारी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-हिवाळी अधिवेशन आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले.राजभवनात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्याप्रमाणे भाजपचा वरचष्मा होता,त्याच पद्धतीने आता खाते वाटपात देखील भाजपचे वर्चस्व महत्त्वाच्या खात्यांवर दिसून येत आहे.फारशी नाराजी न दाखविता अर्थ खाते राखण्यात अजितदादा यशस्वी ठरले तर एकनाथ शिंदे यांना आता नगर विकासवरच समाधान मानावे लागणार आहे.गृह,महसूल,ऊर्जा,आदिवासी विकास, अन्न व नागरी पुरवठा,जलसंधारण, पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण,माहिती तंत्रज्ञान,माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक आरोग्य,सामाजिक न्याय, कामगार,गृह (ग्रामीण),गृहनिर्माण,मत्स्य विभाग बंदरे अशी महत्त्वाची खाती भाजपने आपल्याकडेच ठेवली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यावेळी प्रमाणे अर्थ,अन्न व औषधी प्रशासन,महिला बालविकास,वैद्यकीय शिक्षण ही खाती आहेत.याचवेळी शिवसेनेकडे नगर विकास, शालेय शिक्षण,माती व पाणी परीक्षण,अर्थ नियोजन, गृह (शहर) राज्यमंत्रीपद अशी खाती आहेत.एकंदरीत सर्वाधिक आमदार असल्याने भाजप सहयोगी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा यावेळी अधिक आक्रमकपणे,स्वबळावर पुढे जाण्याच्या पावित्रात दिसत आहे.यामुळेच राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिले दोन दिवस राजी-नाराजी पहायला मिळाली. नेमकी तीच बाब टाळण्यासाठी आता अधिवेशन संपल्यानंतर सावधपणे खातेवाटप जाहीर करण्यात आले.त्यातच सर्व बाबींचा विचार करता खाते वाटप मंत्रीमंडळात यावेळी भाजपचाच पलडा भारी असल्याचे दिसून येत आहे; असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!