Thursday, August 27, 2026
Homeनागपूररस्त्याने पायी जाणाऱ्या इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीच मृत्यू...

रस्त्याने पायी जाणाऱ्या इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीच मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-रस्त्याने पायी जात असलेल्या व्यक्तीस
अज्ञात वाहनाने जोरात धडक देताच सदर व्यक्ती वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याची घटना नागपूर बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल,शनिवारी २१ डिसेंबरला सकाळच्या सुमारास घडली.
गुरुदयाल झाडूलाल पटले वय ४९ वर्षे,रा.ठाकूर ले-आऊट,वर्धमाननगर,बुटीबोरी असे मृत व्यक्तीचे नाव असून,ते बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील युनिटेक कंपनीत कार्यरत होते.काल,शनिवारी सकाळच्या सुमारास ते राष्ट्रीय महामार्गावरील सेंट क्लायरेट स्कूलजवळच्या काठियावाडी बेड्यावर दूध आणण्यासाठी गेले होते.दूध घेऊन ते घराकडे पायी जात असतांना,न्यू आगमन हॉटेल परिसरात मागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली.त्यात ते वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातानंतर आरोपी वाहनचालक तेथून वाहन घेऊन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच,बुटीबोरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद जाधव यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!