Saturday, June 20, 2026
Homeचंद्रपूररेती टाकून भरधाव वेगाने परत जाणारा ट्रॅक्टर पलटी; एकाचा जागीच मृत्यू तर...

रेती टाकून भरधाव वेगाने परत जाणारा ट्रॅक्टर पलटी; एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-रेती टाकून भरधाव वेगाने परत जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका मजुराचा मृत्यू झाला तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार १६ जानेवारीला पहाटे ५ च्या सुमारास चिमूर तालुक्याच्या सावरगाव-नेरी मार्गावरील सावरगाव गावाजवळ घडली.सचिन बापूराव मेश्राम वय ३० वर्षे रा.सावरगाव,ता.चिमूर असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.
सध्या स्थितीत सगळीकडेच अवैध वाळू उपसा होत आहे.अशातच विना नंबरचे ट्रॅक्टर रेती चोरीसाठी वापरून मोठ्या प्रमाणावर शासनास चुना लावल्या जात आहे.रेती चोर चोरीची रेती असल्याने भरधाव वेगात ट्रॅक्टर पळवित असतात.अश्याच प्रकारे आज,गुरुवारी पहाटे सावरगाव येथे रेती टाकून भरधाव वेगाने जात असतांना सावरगाव समोरील छोट्या वळणावर ट्रॅक्टर अनियंत्रीत झाला.यात ट्रॅक्टर बाजूच्या शेतात जाऊन पलटी झाला.पलटी होताच सचिन मेश्राम हा ट्रॅक्टर खाली दबल्याने त्याचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला.सदरचा ट्रॅक्टर हा नेरी येथील अनिकेत जांभुळे यांच्या मालकीचा असून ट्रॅक्टर विना नंबरचा आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!