Monday, June 22, 2026
Homeकुरखेडारानटी हत्तींनी कुरखेडा तालुक्यात घातला धुडगूस.. - शेतीपिकांची मोठ्या प्रमाणात केली नासधूस...

रानटी हत्तींनी कुरखेडा तालुक्यात घातला धुडगूस.. – शेतीपिकांची मोठ्या प्रमाणात केली नासधूस…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून रानटी हत्तींचा वावर आहे.यामुळे शेतीपिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.रानटी हत्तींचा कळप सध्या दादापूर डोंगराच्या आश्रयाला आहे.गेल्या आठवडाभरापासून हत्तींचा कळप सायंकाळ झाल्यानंतर दादापूर,वारवी व चिपरी येथील शेतशिवारात धुडगूस घालत आहे.यामुळे पिके पायदळी तुडविली जात आहेत.सोमवारी नुकसानग्रस्त भागात वनाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
रानटी हत्तींनी दादापूर परिसरातील शेतीपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केलेली आहे.या परिसरात मागील अनेक दिवसांपासून ठाण मांडलेला रानटी हत्तींचा कळप दिवसा डोंगराच्या पायथ्याशी दाट जंगलात दडून असतो तर सायंकाळ होताच येथील शेतशिवारात प्रवेश करीत धान पीक पायदळी तुडवितो.सध्या हलके धानपीक गर्भावस्थेत आहेत. याच पिकावर हत्ती ताव मारत आहेत.हत्तींच्या धुडगुसामुळे शेतकरी हतबल व हैराण झाले आहेत.या नुकसानीचे पंचनामे करून लवकर भरपाई द्यावी; अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे केली आहे.
बालाजी दिघोरे,वनपरिक्षेत्र अधिकारी पुरडा👇
रानटी हत्तींच्या कळपात २२ मोठे तर ६ पिल्ले असे एकूण २८ हत्ती आहेत.हत्तींच्या कळपातील दोन सदस्यांचा विद्युत करंटमुळे मृत्यू झाला.तर दोन हत्ती कळपातून भरकटले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जफेडीसाठी दिलेला चेक बाऊन्स; दोषीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी दुसऱ्या बँकेचा चेक दिला खरी, पण जो चेक देण्यात आला,त्या बँकेच्या खात्यात पुरेसे पैसेच...

३० वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा परिसराच्या वेणा नदीत बुडून एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे,नदीतील...

अवैध तंबाखू साठवणूक व विक्री करणाऱ्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रात गुटखा,पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूवर राज्य शासनाने १९ जुलै २०१२ पासून सक्तीची बंदी लादली; मात्र गेल्या १४ वर्षांत ही बंदी कागदोपत्रीच...

शेतकऱ्याचा जीव घेणाऱ्या वाघाच्या हालचालींवर वनविभागाची बारकाईने नजर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी(बा.)वनपरिक्षेत्रांतर्गत गोविंदपूर उपक्षेत्रातील नागभीड तालुक्याच्या गिरगाव जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात आत्माराम दसरू बोरकर वय ५२ वर्षे,रा.गिरगाव,ता.नागभीड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!