Wednesday, July 15, 2026
Homeमुंबईराज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार अनुकंपा तत्त्वावरील मोठी पदभरती..

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार अनुकंपा तत्त्वावरील मोठी पदभरती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुकंपा तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे. आतापर्यंत चतुर्थ श्रेणीतील पदांची भरती ही प्रामुख्याने खाजगी कंत्राटदारांमार्फत केली जात होती. मात्र,आता अनुकंपा तत्त्वावर ज्या जागा प्रलंबित आहेत; अश्या जागा थेट भरण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे,यासाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.राज्यातील शासकीय तसेच निमशासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवेत असतांनाच निधन झाल्यास,त्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला त्याच विभागात नोकरी देण्याची तरतूद धोरणात आहे.हे धोरण प्रथम १९७३ साली लागू करण्यात आले.काळानुरूप त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.सध्या या धोरणाचा लाभ प्रामुख्याने गट-क आणि गट-ड मधील पदांसाठी उपलब्ध आहे. मात्र,गेल्या काही वर्षांपासून या धोरणाअंतर्गत होणाऱ्या नियुक्त्या रखडल्या होत्या.त्यामुळे हजारो कुटुंबीय प्रतीक्षेत होते.राज्यभरात ९ हजार ५६८ उमेदवार अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार महानगरपालिका,जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमधील आहेत.यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार प्रतीक्षेत आहेत.त्यानंतर पुणे,गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.अनुकंपा तत्त्वावरील पदभरतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही येत्या,१५ सप्टेंबर २०२५ पासून होणार आहे.याबाबत त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे नोकरीसाठी रांगेत उभ्या असलेल्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!