Tuesday, September 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! आता 'नमो शेतकरी सन्मान निधी' योजनेचे २ हजार येणार...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! आता ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजनेचे २ हजार येणार खात्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पीएम किसान योजनेप्रमाणेच महाराष्ट्र राज्याकडून ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजनेतंर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक ६ हजार रुपये जमा करण्यात येतात.आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून एकूण सहा हप्ते वितरीत करण्यात आले असून सातव्या हप्त्याची रक्कम केव्हा जमा होणार,याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. अश्यातच आता राज्यातील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली आहे.नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य शासनाने १९३२.७२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली असून राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सध्या मंजूर झालेला सातवा हप्ता हा एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीसाठी आहे.यापूर्वी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे २ हजार रुपये ३१ मार्च २०२५ रोजी राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे(डीबीटी)जमा करण्यात आले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!