Saturday, October 17, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा शहरात पैगंबर जयंती निमित्त भव्य मिरवणूक तथा मिठाईचे वितरण..

कुरखेडा शहरात पैगंबर जयंती निमित्त भव्य मिरवणूक तथा मिठाईचे वितरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-जश्ने ईद मिलादुन्नबी कमेटी कुरखेडा यांच्या पुढाकाराने इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या जयंती दिनानिमित्त आज, शुक्रवार ५ सप्टेबंर रोजी सकाळच्या सुमारास शहराच्या जामा मस्जिद येथून विविध देखावे व पैगंबरचे गुणगाण करीत मुस्लिम बांधवानी भव्य मिरवणूक काढली.मिरवणूक सकाळी ९ वाजताच्या सुमारास जामा मस्जिद येथून सूरू होत मौलाना आजाद चौक,डॉ.आंबेडकर चौक,फव्वारा चौक,सागर चौक,हनूमान मंदिर व कुंभीटोला रोड मार्गे मार्गक्रमण करीत परत जामा मस्जिद कुरखेडा येथे पोहचली.येथे कमेटीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक आरिफ हूसैन सय्यद यांचा सत्कार करण्यात आला.तर शहरातील प्रथम हाफीज़ फैज़ल यांच्या हस्ते धार्मिक ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी त्यांनी देशात तसेच शहरातील धार्मिक सौहार्द,सूख,शांती व भरभराटी करीता अल्लाहकडे प्रार्थणा केली.दरम्यान,सागर चौकात फीरोज मिस्त्री यांच्या पुढाकाराने आम लंगरचे आयोजन करण्यात आले होते.तर मिरवणूक दरम्यान ठिकठिकाणी शहरातील बालकांना मुस्लिम समाजाच्या वतीने मिठाईचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन उस्मान खान सलातो सलाम शादाब खान यांनी केले.तर कार्यक्रमात जामा मस्जिदचे अध्यक्ष हाजी मसूद शेख,उपाध्यक्ष बबलू भाई हूसैनी,ज्येष्ठ नागरिक हाजी अमानूल्लाह खान, हाजी नवाब हाशमी,हाजी सलीम खाणानी,हाजी मूर्तूजा अहेमद,हाजी बब्बू मस्तान,हाजी मूजफ्फर बारी,हाजी मकसूद खान,अयुब खान,फीरोज मिस्त्री, शफीऊल्लाह खान,शाकीर खान,जमील शेख,जावेद शेख,जिया खान यांचेसह मोठ्या संख्येत मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता जश्ने ईद मिलादुन्नबी कमेटीचे अध्यक्ष न्याज़ सय्यद यांच्या मार्गदर्शनात कमेटीचे पदाधिकारी तथा सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!