- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- ‘थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा,आपणही त्यांचे समान व्हावे; हाच सापडे बोध खरा’..ज्यांच्या नावातच रतन आहे; असा देशाचा अनमोल हिरा आपल्याला काल,बुधवारी अल्पशा आजाराने सोडून गेलेत; असे रतन टाटा.त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे.ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समूहाला नव्या उंचीवर नेणारे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे काल बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.टाटांच्या निधनाचे वृत्त आल्याने अवघा देश स्तब्ध झाला. नवरात्रौत्सवामुळे मुंबईसह देशाच्या अनेक भागात रात्री उशिरापर्यंत दांडिया आणि गरबा सुरु होता.मात्र, टाटांच्या मृत्यूची वार्ता आली आणि गरब्यात नाचणारी पावलं आपोआप थांबली.
मुंबईतील गोरेगाव भागातील नेस्को मैदानावर दरवर्षीप्रमाणे नवरात्रौत्सवानिमित्त गरब्याचे आयोजन करण्यात आले होते.अखेरचे दोन-तीन दिवस या गरब्याला अधिकच रंगत चढते.गरबा-दांडियाचा इव्हेंट रात्री उशिरापर्यंत चालू होता.काल,बुधवारी रात्री उशिरा रतन टाटा यांच्या निधनाची बातमी धडकली आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु असताना काल रात्री टाटांच्या निधनाची बातमी आली. नेस्को ग्राऊण्डवर सुरु असलेल्या गरब्यात टाटांच्या निधनाची बातमी आली आणि उपस्थित थांबले.स्तब्ध उभे राहून उपस्थित नागरिकांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली.अनेकांनी हात जोडून टाटांना मानवंदना दिली.त्यामुळे गोंगाट सुरु असलेल्या जागी अचानक शांतता पसरली.
दरम्यान,रतन टाटा यांचे पार्थिव सकाळी त्यांच्या हलेकाय येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना एनसीपीए या ठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता आले.हिंदू,मुस्लीम,ख्रिस्ती,पारशी, शीख,बौद्ध अशा सात धर्मगुरुंकडून रतन टाटांसाठी प्रार्थना करण्यात आली.
आज,गुरुवारी दुपारी ३.३० वाजता रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी वरळीच्या दिशेने रवाना झाले.सायंकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोड भागातून त्यांची अंत्ययात्रा वरळी येथील स्मशानभूमीत दाखल झाली.सायंकाळी ४.३० वाजता टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
- Advertisement -

