Sunday, June 14, 2026
Homeगडचिरोलीआलापल्लीतील टायगर ग्रुप गणेश मंडळ गडचिरोली जिल्ह्यातून अव्वल..

आलापल्लीतील टायगर ग्रुप गणेश मंडळ गडचिरोली जिल्ह्यातून अव्वल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून आलापल्लीच्या टायगर ग्रुप गणेश मंडळाला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या मंडळास यशवंत नाट्य मंदिर,माटुंगा येथे काल,बुधवारी ९ ऑक्टोंबरला पारितोषिक प्रदान करण्यात आले.पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे,सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत,पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळकर तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव सुमंत पाष्टे रंगमंचावर उपस्थित होते.
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत भारतमाता गणेश मंडळ परभणी यांना प्रथम,जय भवानी मित्र मंडळ ठाणे यांना द्वितीय तर वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव मंडळ लातूर यांना तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला.त्याचप्रमाणे एकूण ३६ जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!