- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६’ अंतर्गत बुधवार २२ जुलै रोजी सर्वप्रथम ५३३ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.या शेतकऱ्यांचे २ कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले होते.विशेष म्हणजे,जे शेतकरी आयकरमध्ये(इन्कम टॅक्स)बसत नाहीत,अश्या शेतकऱ्यांचीच पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती व आयकर विभागाकडून यादी येताच पात्र शेतकऱ्यांना पुढील लाभ देण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले होते.अशातच आता कर्जमाफी योजनेसाठी सहकार विभागाने केलेल्या डेटा पडताळणीत तब्बल ९४ हजार ८३ शेतकरी आयकरदाते म्हणजेच आयकर भरणारे असल्याचे आढळून आल्याने सदरचे शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अपात्र ठरले आहेत.यामुळे राज्य सरकारची तब्बल १ हजार ८८१ कोटी रुपयांची बचत होणार आहे.तर दुसरीकडे, छाननीनंतर पात्र ठरलेल्या १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून उद्या,मंगळवार ४ ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण(डीबीटी) प्रक्रियेद्वारे एकाच वेळी सुमारे ७ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात जमा केले जाणार आहेत.यासाठी शासनाने ३० जुलै २०२६ रोजी ७ हजार कोटी रुपयांच्या निधी वितरणास प्रशासकीय मान्यता दिली आहे.राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्यांचे पीक कर्ज थकीत आहे; अशा शेतकऱ्यांना २ लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी दिली जाणार आहे.तर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या २४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.
- Advertisement -

