Monday, April 27, 2026
Homeभंडारामोटर पंप बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या इसमाचा मृत्यू..

मोटर पंप बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या इसमाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-पावसाच्या पाण्याने विहिरी तुडूंब भरुन गाळ,कचरा व इतर साहित्य पडून सडलेले असतात. त्यातच पाण्यामुळे काही कारणास्तव विहिरीतील मोटर पंप बंद पडत असतात.अशीच विहिरीतील मोटर पंप दुरुस्तीसह बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या एका इसमाचा विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार १३ जुलै रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास लाखनी तालुक्यातील महेगाव मार्गावरील शेत शिवारात घडली.छगन बाळकृष्ण गोटेफोडे वय ४३ वर्षे रा.पालांदूर असे मृताचे नाव असून तो मोटार पंप दुरुस्तीचे काम करायचा.
महेगाव येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीतील मोटारीमध्ये बिघाड झाला होता.तो बिघाड दुरुस्त करण्यासाठी त्यांनी पालांदूर येथील छगन गोटेफोडे यांना बोलविले होते.आज रविवारी पहाटेच्या सुमारास  छगन गोटेफोडे हे विहिरीत उतरुन मोटार दुरुस्तीचे काम करीत होते.दरम्यान,विहिरीतील विषारी वायुमुळे त्यांचा गुदमरुन विहिरीतच मृत्यू झाला.घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांना विहिरीत विषारी वायू असल्याचा संशय आल्याने विहीरीत पेटता टेंभा टाकल्याने तो विझला. त्यानंतर कोंबडीचे पिल्लू टाकले असता पिल्लू बेशुद्ध झाले.लागलीच उपस्थित नागरिकांनी घटनेची माहिती पालांदूर पोलिसांना दिली.माहिती मिळताच पालांदूरचे पोलीस निरीक्षक सतीश बन्सोड ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.लगेच लाखनीचे तहसीलदार धनंजय देशमुख, अग्निशामक दलाचे समीर गणवीर सह कर्मचारी व स्थानिक पोलिसांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या छगन गोटेफोडे याचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी लाखनी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.घटनेचा अधिक तपास पालांदूर ठाण्याचे पोलिस हवालदार देवेंद्र मासुरकर करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

शासन निर्णयात जरी पोपट पक्षीचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही.. – आता पोपट पक्षांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्याने शेतात डाळिंबाची झाडे लावली.पण,अर्ध्याहून अधिकच्या झाडांची फळे ही पोपट पक्षांनी खाऊन नष्ट केली होती.अश्यातच शेतकऱ्याने कृषी विभागास माहिती देऊन पंचनामा...

रखरखत्या उन्हात लग्नसमारंभासाठी प्रवास; बसमध्येच सोडला प्राण.. – आज उष्णतेच्या लाटेचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या स्थितीत नागपूरसह विदर्भाचे तापमान वाढतच आहे.एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून अंगाची लाहीलाही होत आहे.एप्रिल महिन्यातच ही स्थिती आहे,तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!