Monday, April 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतीच्या नुकसानभरपाईसाठी 'फार्मर आयडी ' आवश्यक.. - अन्यथा नुकसानभरपाईच्या रकमेस मुकावे...

शेतीच्या नुकसानभरपाईसाठी ‘फार्मर आयडी ‘ आवश्यक.. – अन्यथा नुकसानभरपाईच्या रकमेस मुकावे लागणार..

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-कित्येकदा अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती ओढवून घेतली जाते.अश्यातच मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे व नदी पात्रातील वाढलेल्या पाण्यामुळे काही भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सदर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठी,ग्रामसेवक व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे सुरू असून नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांची फार्मर आयडी(शेतकरी ओळखपत्र)असणे अत्यावश्यक आहे.राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपली फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे.पीकविमा,पीक कर्ज,पीक नुकसान भरपाई,विविध अनुदान योजना, पीकपद्धती सुधारणा यासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे.सातबाऱ्यावर नाव असलेल्या सर्व खातेदारांनी त्वरित ऑनलाइन ई-केवायसी करून आपली फार्मर आयडी बनवून घ्यावी.ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नसेल,त्यांना शासनाच्या योजना व नुकसानभरपाईचा लाभ मिळणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
ही लागणार दस्ताऐवज👇

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
आधार कार्ड,मोबाईल क्रमांक बैंक खात्याशी लिंक असलेला,७/१२ उतारा,नमुना ८ अ, बैंक पासबुक किंवा खाते तपशील इत्यादी कागदपत्रे फार्मर आयडीसाठी लागणार असून नजीकच्या ऑनलाईन सेतू केंद्रातून फार्मर आयडी काढून घ्यावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासन निर्णयात जरी पोपट पक्षीचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही.. – आता पोपट पक्षांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्याने शेतात डाळिंबाची झाडे लावली.पण,अर्ध्याहून अधिकच्या झाडांची फळे ही पोपट पक्षांनी खाऊन नष्ट केली होती.अश्यातच शेतकऱ्याने कृषी विभागास माहिती देऊन पंचनामा...

रखरखत्या उन्हात लग्नसमारंभासाठी प्रवास; बसमध्येच सोडला प्राण.. – आज उष्णतेच्या लाटेचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या स्थितीत नागपूरसह विदर्भाचे तापमान वाढतच आहे.एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून अंगाची लाहीलाही होत आहे.एप्रिल महिन्यातच ही स्थिती आहे,तर...

असे कोण करते सांगा? ग्रामसेविकेने शासकीय निधी सरकारी कामासाठी न वापरता चक्क व्याजाने दिले वाटून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासन स्तरावरून गावगाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा,यासाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर निधीचे वाटप करण्यात येते.मात्र,काही लोकसेवक मनमर्जिने कामे करून घरचीच...

भरधाव वेगातील रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला अन् तरणेबांड पोरगा दगावला..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ट्रॅक्टरमध्ये रेती भरून रेतीची साठवणूक करण्यासाठी भरधाव वेगात निघालेला रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला आणि चालत्या ट्रॅक्टरवरून खाली कोसळलेल्या चालकाच्या अंगावरून ट्रॅक्टरच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!