- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती शहरात एक हृदयद्रावक घटना मंगळरवाच्या सायंकाळी उघडकीस आली.एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मैत्रिणींसोबत बॅडमिंटन खेळता-खेळता अचानकपणे तोल गेला आणि ती खाली कोसळली.यात डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला.अनुष्का अजय यादव वय १६ वर्षे,रा.आयुध निर्माणी वसाहत,भद्रावती,जि.चंद्रपूर असे मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती ११ व्या वर्गात शिक्षण घेत होती.
अनुष्का ही नेहमीप्रमाणे मैत्रिणींसोबत काल मंगळवारच्या सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आपल्या वसाहतीसमोरील खुल्या मैदानात बॅडमिंटन खेळत होती.खेळता-खेळता ती अचानकपणे खाली कोसळून मुख्य मार्गावर पडल्याने अनुष्काच्या डोक्याला गंभीर मार लागला.डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागल्याने उपस्थित मैत्रिणींनी आरडा-ओरड करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिला तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच अनुष्काची प्राणज्योत मालवली. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून यादव कुटूंबीय शोकसागरात बुडाले आहे.
- Advertisement -

