Thursday, May 28, 2026
Homeकुरखेडामाहिती अधिकार,पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीच्या कुरखेडा तालुका सचिवपदी पुंडलिक दादगाये...

माहिती अधिकार,पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीच्या कुरखेडा तालुका सचिवपदी पुंडलिक दादगाये यांची नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा (गडचिरोली):-माहिती अधिकार,पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीच्या कुरखेडा तालुका सचिवपदी पुंडलिक दादगाये यांची काल रविवारी गडचिरोलीत पार पडलेल्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वानुमते निवड करून
नियुक्ती करण्यात आली आहे.दादगाये हे सामाजिक भान जपणारे,प्रामाणिक व कार्यतत्पर व्यक्तिमत्व आहे.त्यांनी यापूर्वीही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांतून सक्रिय सहभाग घेतला आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यात माहिती अधिकार चळवळ,पत्रकार संरक्षण उपक्रम तसेच पोलीस मित्र अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात मदत होणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलतांना पुंडलिक दादगाये यांनी म्हटले की, “माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन.पत्रकारांचे हक्क संरक्षण, समाजातील दुर्बल घटकांना माहिती अधिकाराच्या माध्यमातून न्याय मिळवून देणे तसेच पोलीस व नागरिक यांच्यात सुसंवाद निर्माण करणे हे माझे प्राधान्य असेल.” पुंडलिक दादगाये यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार बांधव तसेच नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!