Thursday, May 28, 2026
Homeभंडाराकुटुंबियांसमोर मोठे संकट..! शालेय विद्यार्थिनी गर्भवती; अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल..

कुटुंबियांसमोर मोठे संकट..! शालेय विद्यार्थिनी गर्भवती; अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-ज्या वयात शिक्षण घेणे महत्वाचे असते, अश्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते आणि काळ निघून गेल्यास पश्र्चाताप केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नसतो.सध्या स्थितीत मोबाइल व समाज माध्यमांच्या अंध आकर्षणामुळे अल्पवयीन तरुण मंडळी काळाच्या ओघात गुरफटल्या जाऊ लागली आहेत. अश्यातच स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या नादात अनेक अल्पवयीन सामाजिक मर्यादांचा भंग करून चुकीच्या मार्गाला जात आहेत. त्यामुळेच अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अत्याचार, विनयभंग,छेडछाड अशा अनेक अप्रिय घटना वाढल्या आहेत.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शालेय शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी चक्क सहा महिन्याची गर्भवती असल्याची बाब कुटुंबीयांना कळताच पायाखालची जमीनच सरकली.विशेष म्हणजे,घटनेतील दोघेही अल्पवयीन असल्याने दोघांच्याही कुटुंबियांसमोर मोठे संकट उभे येऊन ठाकले आहे.प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध तुमसर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.पीडित मुलगी गत वर्षभरापासून आरोपीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली होती.या कालावधीत तरुणाने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.अखेर त्यातून पीडिता गरोदर राहिली.शरीरात जाणवलेले बदल आणि वैद्यकीय अस्वस्थता आईच्या लक्षात आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी २३ ऑगस्टला कुटुंबीयांनी थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ आरोपी अल्पवयीन मुलास अटक करून विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.समाजात अश्या घटनांवर आळा घातला जावा,विशेष करून
ग्रामीण आणि शहरी भागात अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शैक्षणिक संस्था व प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!