Monday, August 10, 2026
Homeचंद्रपूरमागील वर्षी ३ वर्षीय मुलगा मृत पावला; तर आता अपघातात वडील गेले..

मागील वर्षी ३ वर्षीय मुलगा मृत पावला; तर आता अपघातात वडील गेले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यात काळजाचा ठेका चुकवणारी घटना काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.मागील वर्षी ३ वर्षीय मुलगा पाण्यात बुडून मृत पावला; तर आता अपघातात वडील गेले असल्याची घटना चिमूर तालुक्यातील गोंदेडा-केवडा मार्गावर घडली.रोहन चंदूलाल आत्राम हा काल गुरुवारच्या रात्री अपघातात मृत पावला तर मागील वर्षी त्याचा ३ वर्षीय मुलगा पाण्यात बुडून मृत्यू पावला असल्याने आत्राम कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.त्यातच रोहनला दीड वर्षाची मुलगी आहे.
माहितीनुसार,गोंदेडा-केवडा मार्गावर पुलाचे बांधकाम सुरू आहे.२९ वर्षीय रोहन चंदूलाल आत्राम रा.गोंदेडा व ३७ वर्षीय प्रमोद संतोष धारणे हे दोघेही रात्री ८ वाजेच्या सुमारास केवडा येथून कामे आटोपून गोंदेडा
गावाकडे परत जात होते.अशातच रात्री साडेआठच्या सुमारास पुलाजवळ आल्यानंतर पुलाचे बांधकाम लक्षात न आल्याने भरधाव दुचाकी पुलावर आदळून दोघे गंभीर जखमी झाले.जखमींना पुढील उपचाराकरिता चिमूर येथे नेत असतांना वाटेतच २९ वर्षीय रोहन आत्रामचा मृत्यू झाला.तर सोबती प्रमोद  धारणे जखमी झाला.जखमीला पाठीला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!