Monday, August 10, 2026
Homeगडचिरोलीआपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहण्याचे निर्देश.. - नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये..

आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहण्याचे निर्देश.. – नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सध्याच्या घडीला भारत-सीमेवरील युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध विभागांनी करावयाच्या उपाययोजना तसेच नागरिकांनी घ्यावयाची दक्षता यासंदर्भात आज,शुक्रवार ९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते.सदरची सभा ही प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत विविध विभागांना आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले. पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार करावा,तसेच संवेदनशील प्रकल्पांची रंगीत तालीम घ्यावी,असे निर्देश देण्यात आले.आरोग्य विभागाने सर्व दवाखाने सुरू ठेवण्याची व पुरेसा औषधसाठा सुनिश्चित करण्याची जबाबदारी स्वीकारली.नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाकडून येणाऱ्या सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
 
 
अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल👇
https://whatsapp.com/channel/0029VbAPkzTKGGG8KdTvgY41 फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
आपत्कालीन परिस्थितीत खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा👇
जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष:- ०७१३२-२२२०३१
(07132-222031),
मोबाईल:-९४२३९११०७७ (9423911077)
पोलीस नियंत्रण कक्ष:-०७१३२-२२३१४२/२२३१४९
(07132-223142/223149),
मोबाईल:-९४०३८०१३२२ (9403801322)
पार पडलेल्या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे,निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता  सुमित मुंधडा,नगर परिषद गडचिरोलीचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर,पोलीस निरीक्षक (DSB पथक) निखील फटींग,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  निलेश तेलतुंबडे तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!