Wednesday, September 23, 2026
Homeचंद्रपूरमहाशिवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सहाजण नदीत बुडाले.. - तीन सख्ख्या बहिणी तर तीन...

महाशिवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सहाजण नदीत बुडाले.. – तीन सख्ख्या बहिणी तर तीन मुले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-महाशिवरात्रीच्या जत्रेला आज,बुधवार २६ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे.सर्वत्र शिवाची आराधना,पूजा-अर्चना करण्यासाठी भाविक भक्त धार्मिक स्थळांना भेटी देऊन नतमस्तक होत असतात. अशातच महाशिवरात्रीनिमित्त वैनगंगा  नदीवर कुटुंबीयांसह आंघोळीसाठी गेलेल्या तीन सख्ख्या बहिणी वैनगंगा नदीत बुडाल्या असल्याची घटना आज,बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.प्रतिमा प्रकाश मंडल वय,२३ वर्षे,कविता प्रकाश मंडल वय,२१ वर्षे व लिपिका प्रकाश मंडल वय,१८ वर्षे अशी नदीत बुडालेल्या सख्ख्या बहिणींची नावे असून यापैकी दोघींचे प्रेत मिळाले तर एकीचा शोध सुरू आहे.आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील प्रकाश मंडल हे आपल्या कुटुंबीयांसह गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्याच्या व्याहाड (बुज) येथील वैनगंगा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेले होते.नदी पात्रात उतरल्यावर कविता मंडल,प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल या सख्ख्या बहिणी पाण्याचा अंदाज आल्याने खोलात गेल्या.पोहता येत नसल्याने त्या बुडायला लागल्या.तर एक मुलगा आणि महिलाही प्रवाहात लागल्या. आरडाओरड सुरू झाली,मात्र मदतीला कुणीही नव्हते. यातील तो मुलगा आणि महिला पत्रातील खडक हाताला लागल्याने त्याला पकडून राहिले.मात्र,तीन बहिणी बेपत्ता झाल्या.यातील कविता मंडल व एका बहिणीचे शव मिळाले असून एकीचा शोध सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतल्याने खडकाला पकडून असलेल्या मुलाला आणि महिलेला वाचवण्यात यश मिळाले.
दुसऱ्या घटनेत,चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील तीन युवक आज बुधवारी महाशिवरात्रीनिमित्त जवळच्या वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेले होते.अशातच खोल पाण्यात गेल्याने तिघेही नदीत बुडाले.तुषार शालिक आत्राम वय १७ वर्षे,मंगेश बंडू चणकापुरे वय २० वर्षे, अनिकेत शंकर कोडापे वय १८ वर्षे अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले आहे.या तिघांच्या बाबतीत शोध कार्य सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!