Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजमहात्मा गांधी नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने...

महात्मा गांधी नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षण क्षेत्रात आपल्या नवनवीन उपक्रमांद्वारे तसेच शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने भर घालत ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श निर्माण करणाऱ्या देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर(वार्ड)शाळेचे मुख्याध्यापक खेमराज नारायण तिघरे यांना प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने काल,रविवार १२ ऑक्टोंबर २०२५ रोजी मुंबईच्या टिळक भवन,दादर येथे “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने” गौरविण्यात आले.प्रसंगी कार्यक्रमास राज्यातील अनेक मान्यवर शिक्षणतज्ज्ञ,अधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.
शाळेच्या यशामागे तिघरे यांची दूरदृष्टी👇
तिघरे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर (वार्ड)ही शाळा आज जिल्ह्यातील आदर्श शाळांपैकी एक ठरली आहे.
शाळेत डिजिटल शिक्षण,हरित शाळा उपक्रम,विद्यार्थी संसद,संस्कार शिबिरे,पालक सहभाग अभियान, स्वच्छ शाळा चळवळ,तसेच सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा अशा अनेक प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यात नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रप्रेम जोपासणे हेच या शाळेचे ध्येय ठरले आहे.
स्काऊट-गाइड विभागात उल्लेखनीय कामगिरी👇
सन २०२४-२५ मध्ये शाळेतील १२ विद्यार्थी “कब स्काऊट” विभागात राज्यस्तर चाचणी (चतुर्थ चरण) उत्तीर्ण झाले.ही संपूर्ण देसाईगंज तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली.तर वर्ष २०२५-२६ मध्ये ११ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर “सुवर्ण बाण” (राष्ट्रपती पुरस्कार) प्राप्त करण्याच्या वाटेवर आहेत.
ही सर्व यशकथा तिघरे यांच्या कुशल मार्गदर्शनाची आणि विद्यार्थ्यांवरील त्यांच्या प्रेमभावाची साक्ष देते.
“करून शिकणे” या तत्त्वावर आधारित शिक्षण संस्कृती👇
मुख्याध्यापक तिघरे यांनी शाळेत “करून शिकणे” ही संस्कृती रुजवली.त्यांच्या मते, “शिक्षक हा केवळ अध्यापन करणारा नसून समाज परिवर्तनाचा शिल्पकार असतो.” ही भावना त्यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून प्रत्यक्ष सिद्ध केली आहे.
राजनीचा तेजस्वी तारा-गडचिरोलीचा अभिमान👇
मुख्याध्यापक खेमराज नारायण तिघरे हे मूळचे राजनी,पो.ओपारा,ता.लाखांदूर,जि.भंडारा येथील सुपुत्र असून त्यांनी आपल्या कर्मभूमी देसाईगंज येथे शिक्षणाची नवी दिशा दिली आहे.त्यांचा हा सन्मान फक्त एका व्यक्तीचा नसून राजनी गाव,भंडारा व गडचिरोली जिल्ह्याचा अभिमानाचा क्षण आहे.
शाळेचा सन्मान-शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणास्त्रोत👇
महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, नैनपूर(वार्ड),देसाईगंज ही केवळ एक शाळा नसून संकल्प,समर्पण आणि सामाजिक जबाबदारीचे शिक्षण दालन बनली आहे.तिघरे यांच्या नेतृत्वाखाली या शाळेने दाखवून दिले आहे की सामान्य परिस्थितीतही असामान्य कार्य घडवता येते,जर निष्ठा, सेवाभाव आणि विद्यार्थ्यांविषयी ममत्व असेल तर!
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!