Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीदारू तस्कराने दिमाक लावून काम केला; पण शेवटी जाळ्यात अडकला..!

दारू तस्कराने दिमाक लावून काम केला; पण शेवटी जाळ्यात अडकला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-चोर कितीही शक्कल लढवून काम करीत असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची येथील कुख्यात दारू तस्कर निर्मल धमगाये हा नव-नव्या शक्कल लढवून दारू तस्करी करतो आहे.पण प्रत्येकवेळी शक्कल कामात येत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.यावेळी त्याने चक्क एका राजकीय पक्षाचे चिन्ह असलेल्या व्हीआयपी कारचा दारू तस्करिसाठी वापर केल्याचे उघड झाले आहे. प्रकरणी कोरची पोलिसांनी त्याने लढवलेल्या अक्लीचे वाटोळे करून त्याच्या दोन साथीदारांना अटक करून १८ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या इंग्लिश दारूच्या तब्बल ४० पेट्यासह मुद्देमाल शनिवारी जप्त केला. धम्म गुणवंता बोरकर रा.गिधाडी,ता.गोरेगाव, जि.गोंदिया व लखन जोहरी बेसा रा.बेडगाव, ता.कोरची, जि.गडचिरोली या दोघांना अवैध दारू तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली असून कुख्यात दारू तस्कर निर्मल धमगाये आणि त्याचा मुलगा तरुण धमगाये दोघेही फरार झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तसेच कोरची तालुक्यात लगतच्या गोंदिया जिल्ह्यातून अवैध दारूची तस्करी बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे.यात सापडला तो चोर अन्यथा शिरजोर असे होत असल्याने अवध धंदे फोफावली आहेत.अनेकांना महिण्याकाठी मोठी पाकिटे जात असल्याने कोण अंगला हळद लावून घेणार,असे चित्र आहे.गडचिरोली जिल्ह्यात केवळ नावालाच दारूबंदी असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे अवैध धंदे वाढीस लागून निर्मल धमगाये याची टीम दारू तस्करी करीत असल्याची माहिती कोरची पोलीस ठाण्याचे एपीआय मुकुंद देशमुख यांना मिळाली होती.त्यानुसार सापळा रचण्यात आला.पहिल्यांदा कुरखेडा नजीक कार थांबविण्याचा प्रयत्न केला गेला,पण तस्करांनी चोर-पोलीस खेळ करून वाहनासह पळून गेले.नंतर दुसऱ्या सापळ्यात कोरची जवळील जांभळी मार्गावर जाळ्यात अडकले.पोलिसांनी वाहन,अवैध दारू आणि दोघांना अटक केली आहे.वाहनाची तपासणी केली असता वाहनावर एका राजकीय पक्षाचे चिन्ह दिसून आल्याने ते पाहून पोलीसांनी तोंडावर बोट ठेवला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!