Monday, August 24, 2026
Homeभंडारामक्याच्या शेताला अचानक आग लागली; आग विझवायला धावला..पण जीवच गेला

मक्याच्या शेताला अचानक आग लागली; आग विझवायला धावला..पण जीवच गेला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शेतात राबराब-राबून मक्याचे पीक घेतले.पण, अचानकपणे शेतात आग लागल्याने ती विझवत असतांनाच एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा आगीच्या कचाट्यात सापडल्याने होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरालगतच्या शेतशिवार परिसरात घडली.रामदास गोखलू निंबेकर वय ६५ वर्षे, रा.तलाव वॉर्ड,साकोली,जि.भंडारा असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव असून सदरची आग ही वणव्यामुळे लागली की अन्य कारणामुळे,हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सध्या तीव्र उन्हाचे दिवस असल्याने जंगल परिसरात तसेच इतर ठिकाणी अचानकपणे आग लागण्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.अश्याच प्रकारे शेतकरी रामदास निंबेकर हे शेतावर असतांनाच आगीने रौद्ररूप धारण केले.आगीमुळे शेतातील मका पीक नष्ट होणार यासाठी त्यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र,संपूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने रामदास हे सुध्दा त्यात अडकले आणि मृत पावले.दरम्यान,परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी धावपळ केली.मात्र आगीच्या भडक्यात सापडलेल्या शेतकऱ्याला वाचविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.माहिती मिळताच साकोली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी साकोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!