Saturday, August 29, 2026
Homeबीडभीषण अपघातात तहसीलदाराचा मृत्यू..!

भीषण अपघातात तहसीलदाराचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनावरील अचानकपणे नियंत्रण सुटून बीड जिल्ह्याच्या केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.सदरची दुर्घटना ही लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ घडली.एका कर्तव्यदक्ष आणि तरुण अधिकाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनाने राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महसूल विभागाने शोक व्यक्त केला आहे.
आज पहाटेच्या सुमारास तहसीलदार राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते.पहाटे पाचच्या  सुमारास रेणापूर फाट्याजवळ येताच त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले.यात कार रस्त्याच्या खाली घसरून पलटी झाली.अपघाताची तीव्रता इतकी बिषण होती की,त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताच्या वेळी गाडीत ते एकटेच होते.पहाटेची  वेळ असल्याने परिसरात फारशी वर्दळ नव्हती.मात्र, अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला आहे.दुर्दैवी घटनेमुळे प्रशासन आणि स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!