Monday, August 3, 2026
Homeबीडअन् मनोज जरांगे पाटील थोडक्यात बचावले; लिफ्ट मध्ये बिघाड धाडकन कोसळली खाली..!

अन् मनोज जरांगे पाटील थोडक्यात बचावले; लिफ्ट मध्ये बिघाड धाडकन कोसळली खाली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-लाखो दिलो की धडकन असलेले मराठा
आंदोलक तथा मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचेसह त्यांच्या सहकाऱ्यांचा लिफ्ट मध्ये अपघात घडल्याची घटना आज,रविवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बीड शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये घडली.दुसऱ्या मजल्यावर जात असतांना लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट थेट खालच्या मजल्यावर जाऊन आदळली.यात मनोज जरांगे पाटील यांना मुक्का मार लागला.लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक आल्याने ती ओव्हरलोड झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे ही लिफ्ट पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली.या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली.
मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर असून ते बीड शहरातील शिवाजीराव हार्ड केअर सोनोग्राफी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेट देण्यासाठी गेले होते.पण,रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जात असतांना लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट थेट जमिनीवर आदळली.यात सुदैवाने मनोज जरांगे पाटीलसह सहकारी थोडक्यात बचावले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

तलावात बुडालेल्या तरुणाचा आज सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या धानोरी गावातील २२ वर्षीय तरुण काल रविवारच्या सायंकाळी गाव तलाव परिसरात आंघोळ करण्यासाठी उतरला असता क्षणात दिसेनासा झाल्याने परिसरात एकच...

गडचिरोली जिल्हा माहिती अधिकारी जाधव यांची बदली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव नांदेड येथे बदली करण्यात आली असून आज,सोमवार ३ ऑगस्ट रोजी त्यांना गडचिरोली...

सावधान..! तुमच्याही बँक खात्याचा होऊ शकतो सायबर फसवणुकीसाठी गैरवापर.. – नागरिकांनी आपले बैंक खाते,एटीएम कार्ड,पासबुक कुणालाही वापरण्यासाठी देऊ नये.. – आपले बँक खाते...

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात मागील काही दिवसांत सायबर गुन्हेगारीचा नवीनच गंभीर प्रकार समोर आला आहे.यामध्ये अनेक बँक खातेधारक अडकल्याचे स्पष्ट झाले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!