Friday, June 19, 2026
Homeनागपूरनितीन गडकरींच्या घराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्यास अटक..!

नितीन गडकरींच्या घराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्यास अटक..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील महाल परिसरातील निवास्थनास बॉम्बने उडवण्याची धमकी आज,रविवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास देण्यात आल्याने पोलीस यंत्रणांची एकच तारांबळ उडाली.सदरचा कॉल हा ११२ इमर्जन्सी हेल्पलाइन क्रमांकावर करण्यात आला होता.त्यात गडकरींच्या घरात बॉम्ब असल्याचे सांगितले गेले आणि घर बॉम्बने उडविण्यात येणार,असे सांगितल्या गेले असल्याचे झोन १ चे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांनी सांगितले.त्यानुसार तात्काळ गडकरींच्या सुरक्षारक्षकांना आणि बॉम्ब शोध पथकाला सतर्क करण्यात आले.धमकीच्या कॉलनंतर पोलिसांनी स्थानिक पोलिस ठाण्याला आणि बॉम्ब शोध पथकाला तत्काळ माहिती दिली. गडकरी यांच्या निवासस्थानी कसून तपासणी करण्यात आली, मात्र कोणताही स्फोटक पदार्थ आढळला नाही.त्यामुळे हा कॉल खोटा असल्याचे स्पष्ट झाले.धमकीच्या फोननंतर पोलिसांनी तत्काळ पावले उचलत आरोपीला ताब्यात घेतले आहे.उमेश विष्णु राऊत रा. तुलसीबाग रोड,महाल,नागपूर या संशयिताने गडकरींच्या घराला बॉम्बने उडवण्याचा फोन केला होता.तो मेडिकल चौकाजवळील एका देशी दारूच्या दुकानात काम करतो.त्याने मोबाईलवरून कॉल करून १० मिनिटांत गडकरींचे घर उडवून देण्याची धमकी दिली होती.पोलिसांनी बीमा रुग्णालयाजवळून त्याला ताब्यात घेतले. यापूर्वी मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात अशाच प्रकारचे धमकीचे ईमेल आले होते.त्यानंतर कर्नाटकमधून एका उमेश काथा नामक कुख्यात आरोपीला अटक करण्यात आली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!