Sunday, June 21, 2026
Homeचंद्रपूरभरदिवसा २१ वर्षीय तरुणाचा खून; आज दुपारची घटना..

भरदिवसा २१ वर्षीय तरुणाचा खून; आज दुपारची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील बिबी गावात भरदिवसा २१ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना आज,गुरुवार ६ फेब्रुवारीला दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.शिवराज उर्फ शिवा पांडुरंग जाधव वय २१ वर्षे,रा.रामनगर,बिबी,ता.कोरपना, जि.चंद्रपूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून आरोपींमध्ये अविनाश राधाकृष्ण पिल्ले वय ३० वर्षे व आशिष राधाकृष्ण पिल्ले वय २४ वर्षे रा.रामनगर, बिबी अशी आरोपींची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की,मृतक शिवराज व आरोपींमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला.त्यातच अविनाश पिल्ले हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने मनात राग धरून भाऊ आशिष पिल्ले यास सोबत घेऊन मृतक शिवराजचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार आज गुरुवारी दुपारच्या सुमारास अविनाश पिल्ले व आशिष पिल्ले यांनी शिवराज जाधव याच्यावर प्राणघातक हल्ला चढवून चाकूने सपासप वार करून खून केला व गावातील कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला त्याला फेकून दिले. याबाबत स्थानिक नागरिकांना मृतदेह दिसून आल्याने घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच गडचांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम पथकासह घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला.हत्या प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अविनाश पिल्ले याने स्वतःहून पोलिसांपुढे समर्पण केले असून त्याचा भाऊ आशिष पिल्ले अद्याप फरार असल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.अविनाश पिल्ले याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून
चाकू दाखविणे,अश्लील शिवीगाळ करणे,नागरिकांना धमकावणे व इतरही आरोप त्याच्यावर आहेत.घटनेचा पुढील तपास ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदुर पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!