- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पाथरी येथील ५४ वर्षीय व्यक्ती बैल धुण्यासाठी गेला असता दुथडी वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना गुरूवारी ८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.रूपलाल रामजी वलथरे वय ५४ वर्षे, रा.पाथरी, ता.लाखनी असे नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
रूपलाल हे नदीच्या तीरावर बैल धुत होते.बैल धुता- धुता पलीकडील या तिरावरून पलीकडील तीरावर बैल गेले.त्यांना परत आणण्याकरिता चुलबंद नदीमध्ये उडी घेतली.पोहत जात असताना नदीच्या प्रवाहात रूपलाल वाहून गेले.घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेले गावातीलच देवेंद्र कठाणे व धनराज कोरे यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र, प्रवाहाच्या वेगामुळे रूपलालचा थांगपत्ता लागला नाही.नदीकाठावर व परिसरात पोलीस,महसूल विभाग व गावकऱ्यांनी शोध घेतला.मात्र,त्याचा थांगपत्ता लागला नाही.बैल धुण्याकरिता नदीत नेले असता ते दुसऱ्या तीरावर गेले.त्यांना माघारी आणण्याच्या नादात रूपलालने पोहत जाऊन नदी पार करण्याचा प्रयत्न केला.मात्र,चूलबंद नदी दुथडी भरून वाहत असून,प्रवाह जोराचा असल्याने रूपलालला दुसऱ्या काठावर जाणे शक्य झाले नाही.त्यामुळे प्रवाहाच्या जोरदार लाटेत रूपलाल वाहून गेला.त्याला तात्काळ कठाणे व कोरे यांनी बांबूच्या साहाय्याने शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र,अथांग पाण्यात त्याचा थांगपत्ता लागला नाही.लाखांदूर,पवनी व दिघोरी (मोठी) येथील पोलीस स्टेशनला याबाबत सूचना देण्यात आली.
- Advertisement -

