Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरबापरे..! तब्बल दहा खोके ५०० रुपयांच्या नकली नोटा..

बापरे..! तब्बल दहा खोके ५०० रुपयांच्या नकली नोटा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नकली नोटा तयार करून चलनात आणू पाहणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मोठे यश आले आहे.शहरातील एका फ्लॅटवर टाकलेल्या धाडीत ५०० रुपयांचे तब्बल १० खोके नकली नोटांसह इतर साहित्य असे मिळून ९१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून टोळीतील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. शुभम दिनेश नागर वय २६ वर्षे,रा.पंचेड,ता.जि.रतलाम, मध्यप्रदेश असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,चंद्रपूर शहराच्या उर्जानगर मेजर गेटजवळील राजश्री अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक-२०३ मध्ये अज्ञात इसम ५०० रुपयांच्या नकली नोटांची छपाई करीत असल्याची गोपनीय माहिती काल मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती.माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली.फ्लॅट बंद असल्याने चंद्रपूर शहराच्या बंगाली कॅम्प येथील फ्लॅटचे मालक सुमित पॉल यांची विचारणा केली असता सदरचा फ्लॅट मागील महिनाभरापासून मध्यप्रदेशातील काही व्यक्तींना किरायाने दिल्याचे सांगितले.गुन्हे शाखेच्या पथकाने क्षणाचाही विलंब न करता पंचासमक्ष फ्लॅटचे कुलूप तोडले.आत जाऊन झडती घेतली असता खोलीतील बेडरूममध्ये ५०० रुपयांच्या नकली नोटांची १० खोके, एक कलर प्रिंटर व इतर साहित्य असे मिळून ९१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळून अन्य आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.आरोपी विरोधात दुर्गापूर पोलीस ठाण्यात
भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(२), ३१८(३),३३६(२),३३६(३) व १८२(१) अन्वये अपराध क्रमांक १९६/२०२६ नोंद करण्यात आला असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस प्रशासन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ प्रमोद चौगुले,परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक गौरव कायंदे पाटील,दुर्गापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांकरेडवार,बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर,सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार यांच्यासह पोलीस कर्मचारी जयसिंग, सचिन गुरनुले,संतोष येलपूलवार,गणेश मोहुर्ले,नितीन रायपूरे, रजनीकांत पुट्टावार,किशोर वकाटे,अजित शेंडे, चालक दिनेश अराडे,प्रमोद डंभारे तसेच महिला पोलीस कर्मचारी निराशा तितरे,विजयमाला वाघमारे,छाया निकोडे,अपर्णा मानकर,दिपिका सोडनार,उषा लेडांगे यांच्या पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!