Sunday, April 19, 2026
Homeभंडाराप्रेमविवाह ठरला आडकाठी; खुनाची सुपारी.. - पाच जणांना अटक..

प्रेमविवाह ठरला आडकाठी; खुनाची सुपारी.. – पाच जणांना अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मुलीशी प्रेमविवाह करणाऱ्या २५ वर्षीय जावयाच्या खुनाची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याची घटना मोहाडी तालुक्याच्या बेटाळा गावात  उघडकीस आली.सर्वत्र भारतीय प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरू असतांनाच सदरची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली.प्रकरणी मोहाडी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून आज, मंगळवारी पाच जणांना अटक केली आहे.आकाश शेंडे वय २५ वर्षे,रा.बेटाळा,ता.मोहाडी,जि.भंडारा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर मृतकाची सासू अंजू रमेश कुंभलकर वय ४३ वर्षे,साळा चेतन रमेश कुंभलकर वय २३ वर्षे यांच्यासह हत्येतील सहभाग असलेले भारत मोहतुरे वय २६ वर्षे,महेंद्र बोरकर वय ३१ वर्षे,दिनेश उर्फ सचिन मोहन ईश्वरकर वय ३७ वर्षे असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की,आकाश शेंडे याने अवघ्या दोन महिन्यांपूर्वी गावातीलच सासू अंजू कुंभलकरच्या मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता.मुलीनेही घरच्यांच्या विरोधाला झुगारून आकाश सोबत राहण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार,नवदांपत्य बेटाळा गावातच वास्तव्यास होते.मात्र,सदरची बाब ही मुलीच्या आईच्या मनात खटकू लागली आणि  जावयाच्या खुनाचा कट रचून आकाश शेंडेची हत्या करण्यात आली.हत्येनंतर तरुणाचा मृतदेह गावालगत असलेल्या नाल्यात फेकून ती आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आला.मात्र,मोहाडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपासाची चक्रे वेगाने फिरवत जावयाची आत्महत्या नसून सासूने खुनाची सुपारी देत हत्या केल्याचा कट उघडकीस आला आहे.प्रकरणी मोहाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!