उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्याआमगाव येथील मनीषा दिलीप भोयर यांना विदर्भ कोंकण ग्रामीण बँक शाखा देसाईगंज (वडसा) द्वारे दिनांक- २७ मार्च रोजी प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने अंतर्गत २ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला.यांचे पती दिलीप भोयर यांचे अपघाती निधन झाले होते.त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले.दिलीप भोयर यांनी विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंक शाखा वडसा येथे प्रधानमंत्री सुरक्षा बिमा काढला असल्याने शाखा व्यवस्थापक सुशिल धोपेकर यांच्या हस्ते विम्याचा लाभ त्यांच्या वारसदार पत्नी मनीषा दिलीप भोयर यांना देण्यात आला.या प्रसंगी बॅंकेचे कर्मचारी आशिष नागदेवते, गजानन देशमुख उपस्थित होते.
आजही समाजात विमा म्हटले की नकारात्मक भावना दिसून येते.परंतु आजच्या बदलत्या जीवनशैलीत विमा असणे अत्यंत महत्वपूर्ण झाले आहे.त्यामुळे गोरगरीब जनतेसह सर्वांना परवडेल याकरिता वार्षिक ४३६ रुपयामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा व वार्षिक २० रुपयामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा बिमा हे भारत सरकार अंतर्गत बॅंकेद्वारे काढण्यात येतात.ज्यांचा लाभ व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्यांच्या वारसदारांना प्राप्त होतो.ग्रामीण बॅंकेद्वारे प्राप्त झालेल्या लाभामुळे जनतेमध्ये या विम्यांबद्दल जागृती निर्माण होईल; असे मत शाखा व्यवस्थापक सुशिल धोपेकर यांनी व्यक्त केले.

