उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज (गडचिरोली) :- देसाईगंज पोलीस प्रशासनाने गस्ती दरम्यान देसाईगंज ब्रम्हपुरी रोड वरील विर्षी वार्ड जवळ एका संशयित इसमास विचारपूस करून ताब्यात घेतले;विचारपूस करित असताना आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावरून संशय अधिक बळकट झाल्याने सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले.अधिक विचारपूस केली असता,सदर इसम हा अनेक घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी असल्याचे कळले.सदर आरोपीचे नाव व्यंकटी रामा घोडमारे वय ३८ वर्ष राहणार विर्षी वार्ड देसाईगंज असे आरोपीचे नाव आहे.
सदर आरोपी हा नुकताच दोन महिन्याआधी जळगाव जेल मधून सुटला असल्याची माहिती आरोपीने दिली. सदर आरोपी वर जळगाव,भुसावळ,चंद्रपूर, भंडारा,नाशिक,औरंगाबाद,नागपूर जिल्ह्यात घरफोडी चे गुन्हे दाखल आहेत.तसेच नजीकच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात घरफोडी चा गुन्हा दाखल आहे.सदर आरोपीला देसाईगंज पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन देसाईगंज येथील अनेक घरफोडी संदर्भात विचारपूस करण्याकरिता देसाईगंज पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे.सदर तपास देसाईगंज पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर हे करीत आहेत.

