Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजप्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने अंतर्गत विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंकेद्वारे लाभार्थीला मिळाला २...

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने अंतर्गत विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंकेद्वारे लाभार्थीला मिळाला २ लाख रुपयांचा लाभ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्याआमगाव येथील मनीषा दिलीप भोयर यांना विदर्भ कोंकण ग्रामीण बँक शाखा देसाईगंज (वडसा) द्वारे दिनांक- २७ मार्च रोजी  प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने अंतर्गत २ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला.यांचे पती दिलीप भोयर यांचे अपघाती निधन झाले होते.त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले.दिलीप भोयर यांनी विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंक शाखा वडसा येथे प्रधानमंत्री सुरक्षा बिमा काढला असल्याने शाखा व्यवस्थापक सुशिल धोपेकर यांच्या हस्ते विम्याचा लाभ त्यांच्या वारसदार पत्नी मनीषा दिलीप भोयर  यांना देण्यात आला.या प्रसंगी बॅंकेचे कर्मचारी आशिष नागदेवते, गजानन देशमुख उपस्थित होते. 

आजही समाजात विमा म्हटले की नकारात्मक भावना दिसून येते.परंतु आजच्या बदलत्या जीवनशैलीत विमा असणे अत्यंत महत्वपूर्ण झाले आहे.त्यामुळे गोरगरीब जनतेसह सर्वांना परवडेल याकरिता वार्षिक ४३६ रुपयामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा व वार्षिक २० रुपयामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा बिमा हे भारत सरकार अंतर्गत बॅंकेद्वारे काढण्यात येतात.ज्यांचा लाभ व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्यांच्या वारसदारांना प्राप्त होतो.ग्रामीण बॅंकेद्वारे प्राप्त झालेल्या लाभामुळे जनतेमध्ये या विम्यांबद्दल जागृती निर्माण होईल; असे मत शाखा व्यवस्थापक सुशिल धोपेकर यांनी व्यक्त केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!