- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-शहर पोलिसांनी ऐन दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला मोठा डाव हाणून पाडत चार जणांना अटक करून दोन देशी कट्टे,दोन माऊझर गन,३५ जिवंत काडतुसे आणि चार लोखंडी खंजर असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.काल सोमवारच्या रात्री गंजवॉर्ड येथे केलेल्या या कारवाईत चंद्रेश उर्फ छोटू देसराज सूर्यवंशी, बोरीस श्रीनिवास कुसुमा, मुकेश राजू वर्मा ऊर्फ टंक्यू,अमित बाडकुराम सोनकर सर्व रा.बल्लारपूर या चौघांना अटक केली आहे.काल,सोमवार २० ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनचे डी.बी.पथकातील अधिकारी, अंमलदार रात्री गस्त घालत असतांना,रेकॉर्डवरील आरोपी छोटू सूर्यवंशी रा.बल्लारपूर आपल्या साथीदारांसह काळ्या रंगाच्या कारने गंजवार्ड येथील दादामिया ट्रान्सपोर्ट गॅरेजसमोर देशी कट्टा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारावर पोलिसांचे पथक रवाना झाले. दरम्यान,त्या ठिकाणी संशयास्पद हालचाल दिसताच पोलिसांनी तात्काळ घेराव घातला.त्यावेळी आठ जणांपैकी चार जण पळून गेले,तर चार जणांना पोलिसांनी शिताफीने पकडले.कारची झडती घेतली असता सीटच्या खाली दोन देशी कट्टे,दोन माऊझर गन,३५ जिवंत काडतुसे,चार लोखंडी खंजर व अन्य साहित्य असा मोठा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी शस्त्रासह एकूण १७ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास ठाणेदार निशिकांत रामटेके करीत आहेत.प्रकरणी शहर पोलिसांनी,भा.दं.वि.कलम ३१०(४)सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,४,२५ अंतर्गत गुन्हा नोंद केला असून फरार आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले, ठाणेदार निशीकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवने,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे,विलास निकोडे,लक्ष्मण रामटेके,संजय धोटे,इम्रान शेख,सचिन बोरकर,निकेश ढेगे,रुपेश परते,जावेद सिद्दिकी यांनी केली.
- Advertisement -

