Friday, June 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपुढील चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस घालणार थैमान…- अवकाळी पावसा बरोबरच येणार उष्णतेची...

पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस घालणार थैमान…- अवकाळी पावसा बरोबरच येणार उष्णतेची लाट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ऊन आणि पासाचा खेळ सुरूच आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने  झोडपून काढले आहे.तर काही राज्यांमध्ये कडाक्याच्या ऊन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. तर दुसरीकडे तापमान वाढल्यामुळे घामाच्या धारा निघत आहेत.या ऊन-पावासाच्या खेळामुळे नागरिक हैराण झाले आहेत.अशामध्ये आता हवामान खात्याने राज्यात पुढचे ४ दिवस काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस तर काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे.या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.या पावसामुळे शेतपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले.भाजीपाला,आंबा,संत्रे, कांदा,मका,ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. अशामध्ये सरकारने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तर दुसरीकडे राज्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढल आहे.राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. त्याचसोबत नांदेड,पैठण आणि पालघर उष्णाघाताने मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह (३०-४० किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.पुढील चार दिवस या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक पर्यावरण दिन विशेष.. राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची शाश्वत विकासाकडे वाटचाल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाच्छादित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीने पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांचा अद्वितीय संगम साधला आहे.राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!