Friday, June 5, 2026
Homeगडचिरोलीजागतिक पर्यावरण दिन विशेष.. राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची शाश्वत विकासाकडे...

जागतिक पर्यावरण दिन विशेष.. राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची शाश्वत विकासाकडे वाटचाल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाच्छादित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीने पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांचा अद्वितीय संगम साधला आहे.राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्याने सामुदायिक वनहक्क,ग्रामसभा सक्षमीकरण,वनाधारित अर्थव्यवस्था,जलसंधारण आणि हरित विकासाच्या विविध उपक्रमांद्वारे शाश्वत विकासाचे प्रभावी मॉडेल निर्माण केले आहे.पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांचा विकास यांचा समतोल साधत गडचिरोली आज देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या विकासाचा विचार मांडताना ‘जल,जंगल आणि जमीन सुरक्षित ठेवूनच विकासाची वाटचाल होईल’असे स्पष्टपणे नमूद केले आहे.पर्यावरण संरक्षण आणि विकास हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत,या भूमिकेतून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.याच दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात हरित क्षेत्र अधिक समृद्ध करण्यासाठी व्यापक जनसहभागातून एक कोटी वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत आहे.
  • वनहक्कांमुळे पर्यावरण संरक्षणाला नवी दिशा👇
वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गडचिरोली जिल्हा आज देशभरात विशेष ओळख निर्माण करत आहे.जिल्ह्यात ३३ हजार ३०८ वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करून ३९ हजार ३३८.३२ हेक्टर क्षेत्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.तसेच १ हजार ४५८ सामुदायिक वनहक्क(CFR) मंजूर करण्यात आले असून त्याअंतर्गत ५ लाख २१ हजार ५८० हेक्टरपेक्षा अधिक वनक्षेत्राचे व्यवस्थापन अधिकार ग्रामसभांना प्रदान करण्यात आले आहेत.
या माध्यमातून ग्रामसभांना जंगलांचे संरक्षण, पुनर्निर्मिती,जैवविविधतेचे संवर्धन,वन्यजीव संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.वनहक्क कायद्याच्या कलम ५ अंतर्गत ग्रामसभांना वन, वन्यजीव,जैवविविधता आणि पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारीही देण्यात आली आहे.
  • ग्रामसभा सक्षमीकरणाचा राज्यस्तरीय गौरव👇
ग्रामसभा सक्षमीकरण आणि सामुदायिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गडचिरोली जिल्ह्याला मागील वर्षी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता(प्रगती)पुरस्कारात विभागीय स्तरावर तृतीय क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला आहे. सामुदायिक वनसंपत्तीचे व्यवस्थापन,स्थानिकांचा सहभाग आणि पर्यावरण संरक्षणासाठी उभारलेले हे मॉडेल राज्यभरात आदर्श मानले जात आहे.
  • धुररहित चुली : पर्यावरण आणि आरोग्याचा संगम👇
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून धानोरा आणि एटापल्ली तालुक्यात राबविण्यात आलेल्या २० हजार धुररहित चुली वितरण उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाला नवे बळ दिले आहे.या चुलींमुळे जळाऊ लाकडावरील अवलंबित्व कमी झाले असून जंगलांवरील दबाव घटण्यास मदत झाली आहे. यासोबतच कार्बन उत्सर्जनात घट होऊन हवामान बदलाच्या परिणामांवर नियंत्रण मिळविण्यासही मदत होत आहे.या यशाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध आदिवासी बहूल जिल्ह्यात अशा १० लाख धुररहित चुली वितरीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
  • जलसंधारण आणि हवामान बदलाशी लढा👇
हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारणाला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे.गाळमुक्त-गाळयुक्त उपक्रम,नाला खोलीकरण, जलस्रोत पुनरुज्जीवन,जलसंधारण संरचना आणि वृक्षसंवर्धनाच्या विविध मोहिमांमुळे भूजल पातळी सुधारण्यास,शेती उत्पादनक्षमता वाढण्यास आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होत आहे.
  • पर्यावरणपूरक पर्यटनाची नवी ओळख👇
टिपागड, बिनागुंडा धबधबा, भामरागड व सोमनूर येथील त्रिवेणी संगम, कमलापूर हत्ती कॅम्प, आलापल्ली वनवैभव, चपराळा अभयारण्य, कुरखेडा तालुक्यातील गाब्रा टेकड्या, वडधम फोसाईल पार्क यांसारखी नैसर्गिक पर्यटनस्थळे गडचिरोलीची विशेष ओळख आहेत.
  • निसर्गाशी एकरूप आदिवासी संस्कृती👇
गडचिरोलीतील आदिवासी समाजाचा निसर्गाशी अतूट संबंध आहे.जंगल,जलस्रोत,पर्वत आणि जैवविविधतेबाबत आदराची भावना त्यांच्या संस्कृतीत आणि परंपरांमध्ये खोलवर रुजलेली आहे.निसर्गाचे संवर्धन हे केवळ कर्तव्य नसून जीवनशैलीचा अविभाज्य भाग असल्याने पर्यावरण संरक्षणाची मूल्ये पिढ्यान् पिढ्या जपली जात आहेत.
  • शाश्वत विकासाचा गडचिरोली मॉडेल👇
सामुदायिक वनहक्क,वैयक्तिक वनहक्क,ग्रामसभा सक्षमीकरण,एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट, धुररहित चुली,जलसंधारण, पर्यावरणपूरक पर्यटन आणि आदिवासींची निसर्गकेंद्री जीवनशैली या सर्व घटकांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा पर्यावरण संरक्षणाचा लोकसहभागी आणि शाश्वत विकासाचा आदर्श ठरला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!