Friday, June 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी,भाजप नेत्याची नक्षलवाद्यांनी घरात घुसून केली हत्या…

मोठी बातमी,भाजप नेत्याची नक्षलवाद्यांनी घरात घुसून केली हत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील नक्षलवाद्यांविरोधातील सर्वात मोठ्या कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे.नक्षलवाद्यांनी एका भाजप नेत्याची घरात घुसून हत्या केली आहे.या हत्येनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा दलांच्या कारवाईत २९ नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याने बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

ही घटना बयानार परिसरातील दंडवन गावातील आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता नक्षलवाद्यांनी भाजप कार्यकर्ते आणि उपसरपंच पंचम दास मानिकपुरी उर्फ गोलू यांच्या घरी पोहोचले. यावेळी नक्षलवादी दार तोडून भाजप नेत्याच्या घरात घुसले आणि धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली.हत्येनंतर नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठीही सोडली आहे.

नक्षलवाद्यांनी भाजप नेत्याच्या घराबाहेर एक फलक लावला आहे.त्या फलकावर मृत भाजप नेत्यावर भ्रष्टाचारासोबत पोलिसांचा खबऱ्या असल्याचा आरोप केला आहे.उपसरपंच आपले ऐकत नव्हते. म्हणून त्यांची हत्या केल्याचे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे.पोलीस घटनास्थळी पोहोचलेत.त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.या घटनेनंतर पोलीस दल,डीआरजी,आयटीबीपीचे पथक तपास करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक पर्यावरण दिन विशेष.. राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची शाश्वत विकासाकडे वाटचाल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाच्छादित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीने पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांचा अद्वितीय संगम साधला आहे.राज्याचे ‘फुफ्फुस’ म्हणून ओळख असलेल्या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!