- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या खोकरला येथे आश्चर्यचकित करणारी घटना घडली.एकाने पहिल्यांदा पैसे न देताच दुसऱ्याकडून फ्लॅट खरेदी केला व नंतर तोच फ्लॅट इतर चार जणांना विकून,त्यातून २२ लाख रुपये कमवून तब्बल ११ महिने पसार झाला.त्यामुळे त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.फसवणुकीच्या गुन्ह्यात ११ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.न्यायालयाने त्याला ३ दिवस पीसीआरमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सदरचा प्रकार खोकरला,ता.जि.भंडारा येथे घडला असून चेतन लेंडे रा.तकिया वॉर्ड,भंडारा असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की,आरोपी चेतन लेंडे याने इम्रान कादरी वय ३६ वर्षे रा.भंडारा यांच्या मालकीचा खोकरला येथील फ्लॅट सुमारे ११ महिन्यांपूर्वी त्याच्या नावावर नोंदविला होता.परंतु लेंडे याने कादरी यांना
रक्कम दिली नाही.त्यानंतर लेंडे याने तोच फ्लॅट रोशन रोकडे यांना विकून त्यांच्याकडून १४ लाख रुपये कमावले.लेंडे याने पैसे कमावूनही इम्रान कादरी यांना रक्कम दिलीच नाही.तक्रारदाराचा फ्लॅट त्यांच्या नावावर करून घेतल्यानंतर लेंडे याने फ्लॅटच्या विक्रीसाठी अन्य तीन जणांशी करार करून त्यांच्याकडून ८ लाख रुपये घेतले.यासंदर्भात फिर्यादी इम्रान कादरी यांनी भंडारा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती.त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करून गत ११ महिन्यांपासून फरार चेतन लेंडे याला ७ डिसेंबरला अटक केली.सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन,अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी,पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निशांत जुनोनकर,पोलिस हवालदार निकेश भैसारे यांनी केली.
- Advertisement -

