Saturday, September 12, 2026
Homeभंडारापट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केल्याची घटना लाखनी वन विकास महामंडळाच्या किटाडी जंगल परिसरातील कक्ष क्रमांक-३८९ मध्ये उघडकीस आली. लाखनी तालुक्यातील किटाडी जंगल शिवार व आजूबाजूच्या परिसरात मागील दोन वर्षापासून पट्टेदार वाघाची दहशत कायम आहे.वाघ नियमितपणे पाळीव जनावरांना आपले लक्ष्य करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.गिरीधर मारोती उपासे रा.तिरखुरी,ता.लाखनी,जि.भंडारा असे नुकसानग्रस्त पशूपालकाचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे काल रविवारी गिरीधर उपासे यांच्या मालकीची गाय गुरे राखणाऱ्यांच्या कळपात जंगल परिसरात चराईसाठी गेली होती.चराई करीत असतांनाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने एका गायीची शिकार केली.त्यामुळे कळपातील उर्वरित गायी भेदरून पळायला लागल्या.दरम्यान, गुराख्याने सदर घटनेची माहिती गावात दिली असता घटनाक्रम लक्षात आला.घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा करून पुढील प्रक्रिया पार पाडली.वाघाने ऐन गर्भार गायीला ठार केल्याने पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!